शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
2
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
3
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
5
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
6
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
7
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
8
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
9
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
10
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
11
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
12
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
13
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
14
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
15
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
16
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
17
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
18
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
19
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
20
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा

सर्वच इंग्रजी शाळांना अनुदान द्या

By admin | Updated: July 28, 2015 02:12 IST

पणजी : राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सरकारी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी फोर्सच्या सदस्यांनी केली. मागण्या पूर्ण व्हाव्यात

पणजी : राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सरकारी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी फोर्सच्या सदस्यांनी केली. मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी पणजी येथील आझाद मैदानावर फोर्सच्या सदस्यांनी एकत्रित येऊन उपोषण केले. भाजपा सरकारने साडेतीन वर्षांपूर्वी निवडणुकीसाठी इंग्रजी शाळांना अनुदान देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर याबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नाही. मध्यंतरी शिक्षण क्षेत्रात बरेच बदल करण्यात आले; पण या विषयाबाबत निर्णय घेणे सरकारला आवश्यक वाटत नाही. राज्यात हजारोंनी विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयांत शिक्षण घेतात. राज्यातील ग्रामीण वस्तीतही अनेक इंग्रजी माध्यमाची चांगली विद्यालये उभी राहिली आहेत. अशा विद्यार्थ्यांना सरकारकडून अनुदान मिळाल्यासच विद्यालयांच्या साधनसुविधांत वाढ करता येईल. शाळांना अनुदान देण्याबाबत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आश्वासन दिले होते. मात्र, सध्या सत्ताधारी शब्द फिरवत असल्याचे स्पष्ट जाणवते आहे. भाषावाद, शिक्षण हे केवळ राजकारणाचे माध्यम असून याद्वारे राजकारण्यांना राजकारण करण्याची संधी मिळते. या वेळी मात्र अनुदानाचा प्रश्न ताबडतोब मिटविणे आवश्यक असून त्यासाठी मुदत देण्यात येणार नाही. जोपर्यंत सरकारकडून सर्व इंग्रजी शाळांना अनुदान देण्यात येईल अशी मागणी मान्य करण्यात येणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा फोर्सच्या सदस्यांनी दिला.