शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

सत्तरीत २२ जानेवारी रोजी भव्य दिवाळी: मंत्री विश्वजीत राणेंचा विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 17:33 IST

सत्तरीतील घराघरांवर फडकणार श्रीरामांचे भगवे ध्वज.

नारायण गावस, वाळपई : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदीर प्रतिष्ठापनेचा देशभर उत्सव साजरा केला जाणार असून त्याचाच भाग म्हणून सत्तरी आणि उसगावात सर्वात मोठी  दिवाळी लाोकांना पहायला मिळणार, असे  आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले. आज रविवारी मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते सत्तरीतील काही घरांमध्ये श्रीरामाचे फोटो असलेले भगवे ध्वज देण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा पंचायत सदस्या देवयानी गावस, तसेच भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित  होते. सत्तरीतील घराघरांवर श्रीरामाचे भगवे ध्वज

श्री राम मंदिराच्या उद्घाटनाला सर्व देशभर दिवाळी साजरी केली जाणार आहे. राज्यातही या दिवशी मोठा उत्सव असणार आहे. पण सर्वात मोठी दिवाळी राज्यातील लोकांना सत्तरी आणि उसगावामध्ये पाहायला मिळणार आहे. आम्ही सत्तरीतील आणि उसगावातील प्रत्येक घराघरामध्ये श्रीरामाचे फोटो असलेले भगवे ध्वज दिले आहेत.  हे भगवे ध्वज प्रत्येक घराघरांवर लावले जाणार आहेत. तसेच सत्तरीतील सर्व मंदिरामध्ये हे ध्वज लावले जाणार आहेत. आमच्या कार्यकर्त्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून या ध्वजांचे सर्वांना वाटप केले जात आहे. तसेच या दिवशी सर्व मंदिरामध्ये पूजाअर्चा आरती असणार आहे. सर्व धार्मिक स्थळांवर हा दिवस मोठ्या उत्सहात साजरा होणार आहे, असेही मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

मंत्री राणेंकडून घरोघरी जाऊन ध्वज भेट 

मंत्री विश्वजीत राणे यांनी दुपारच्या वेळी पायी चप्पल न घालता तासभर चालत काही जणांच्या घरी जाऊन घरातील ज्येष्ट नागरिकांना श्रीरामाचे ध्वज दिले. यावेळी त्यांनी लोकांना घरावर हे ध्वज लावण्यास सांगितले. तसेच घराघरात या दिवशी दिवे लावून दिवाळी साजरी करण्यास सांगितले. तसेच त्यांनी या ज्येष्ट नागरिकांकडून आशीर्वाद घेतला. सध्या पर्ये मतदार संघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे तसेच मंत्री विश्वजीत राणे श्रीरामाच्या मंदिर उद्घाटनाचा सत्तरीतील गावागावात जाऊन प्रचार प्रसार करत आहेत.

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना निमित्त वाळपई आणि उसगावामध्ये श्रीरामाची ७० बाय ३० आकाराची मोठी रांगोळी काढण्यात आली आहे.  ही रांगोळी सध्या सर्वांचे आकर्षण ठरत आहे. अनेक लोक ही रांगोळी पाहायला येत आहेत. तसेच सर्व मंदिरामध्ये अशा प्रकाराची रांगोळी काढली जात आहे.

टॅग्स :goaगोवा