शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून मराठीची गळचेपी; आणखी २०० शाळांना कुलूप लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:29 IST

वेलिंगकरांची सरकारवर टीका, २०२७च्या पूर्वी मराठीला राजभाषा बनवू

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात १३०० च्या आसपास मराठीशाळा होत्या. मात्र, भाजप सरकारच्या काळात मराठीशाळांना घरघर लागली. गेल्या पाच वर्षात ५० शाळा बंद पाडल्या आहेत. तर सरकार एक शिक्षक असलेल्या २०० शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून मराठीची गळचेपी सुरू आहे, असा आरोप प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केला.

पणजी येथे मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला दीड वर्ष बाकी आहे. त्यादृष्टीने निवडणूकीपूर्वी राजभाषा कायद्यात दुरुस्ती करुन मराठीला राजभाषेचे स्थान दिले तर आम्ही तुम्हाला मतदान करू, असे उमेदवाराला सांगण्याचे धाडस आमच्यामध्ये असणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी व्होट बँक तयार करण्याच्या दिशेने पावले उचलण्याची गरज असल्याचे सुभाष वेलिंगकर म्हणाले.

भाजप सरकारने मराठीचे पंख कापण्याचे काम केले आहे. मागील वर्षात कोंकणी अकादमी, दाल्गादो अकादमीला एकूण १० कोटींचे अनुदान सरकारने दिले. मराठीला केवळ २ कोटी अनुदान दिले आहे. गोमंतकीयांना नोकरीत प्राधान्य मिळावे, असे कारण पुढे करुन मराठी भाषेला नोकरभरती प्रक्रियेतही डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

निर्धार समितीचे अध्यक्ष अशोक नाईक म्हणाले, मराठी ही संस्काराची भाषा. या भाषेला शेकडो वर्षाची समृद्ध अशी परंपरा लाभली आहे. मात्र सरकारला मराठी भाषेला संरक्षण देण्यात अपयश आले. मराठी शाळा बंद पडत आहेत. भविष्यात त्यांचे गंभीर परिणाम दिसून येतील. सत्तेसाठी व अल्पसंख्याकांना खुश ठेवण्यासाठी सरकार मराठीला डावलत आहे. मात्र, मराठी ही राजभाषा झालीच पाहिजे हा निर्धार आम्ही करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मराठीप्रेमी अनिल खंवटे, गो. रा. ढवळीकर, देविदास आमोणकर, चित्रा क्षीरसागर, नेहा उपाध्ये, मिलिंद कारखानीस, वेद आमोणकर, आश्विनी अभ्यंकर, रामदास सावईकर, शाणू सावंत, शरदचंद्र रेडकर व्यासपीठावर उपस्थित होते.

कोंकणीला विरोध नाही, पण मराठी राजभाषा हवीच

भारतीय संस्कृती जपण्यात मराठीचा मोठा वाटा आहे. कोंकणीला राजभाषेचा दर्जा दिला, त्याचे स्वागतच आहे. पण मराठीच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही. आम्ही कोंकणीच्या विरोधात नाही. परंतु, मराठीला राजभाषेचा दर्जा मिळायलाच हवा, अशी भूमिका उद्योजक अनिल खंवटे यांनी मांडली.

मराठीबाबत द्वेष नको

मराठी भाषेबाबत काही जण द्वेष पसरवत आहेत. त्यांनी हा द्वेष पसरवणे थांबवावे. आमचा कोंकणीला विरोध नाही. मात्र मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा. कोंकणी भाषेला आम्ही एकत्र घेऊन जाऊ. परंतु मागील सहा वर्षात या सरकारच्या काळात मराठीची उपेक्षाच झाली आहे, अशी टीका वेलिंगकर यांनी केली. 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळाmarathiमराठी