शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डांबराच्या आयातीत सरकारची भूमिका मर्यादित : दिपक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 17:32 IST

मंत्री पाऊसकर यांनी नुकतीच केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली.

पणजी : गोवा सरकारने गोव्यात रस्ते, पुलांची व अन्य साधनसुविधांची प्रचंड कामे चालविली आहेत. विशेषत: रस्त्यांच्या कामांसाठी डांबराचा फार मोठा तुटवडा आहे. गोवा सरकारने डांबराची आयात करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे असे ठरवले आहे. प्रत्यक्ष आयातीत सरकारची भूमिका मर्यादित असेल, असे गोव्याचे नवे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिपक प्रभू पाऊसकर यांनी खास लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.मंत्री पाऊसकर यांनी नुकतीच केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. डांबराच्या तुटवडय़ाचा विषयही त्यांनी तिथे मांडला. पाऊसकर यांनी शनिवारी लोकमतला सांगितले, की गोव्यात आणि देशभरात सगळीकडेच सध्या रस्ते, महामार्ग व अन्य तत्सम कामे प्रचंड प्रमाणात सुरू आहेत. गोव्यात पंधरा हजार कोटींची कामे यापूर्वीच्या काळात केंद्र सरकारने मंजुर केली. ही कामे मार्गी लागली आहेत पण कंत्रटदारांना डांबराची समस्या सतावत आहे. गोव्यात डांबर उपलब्ध नाही.मंत्री पाऊसकर म्हणाले, की डांबर आयात सरकारला करता येत नाही, कारण मंत्रिमंडळाचा निर्णय वेगळा आहे असे विधान माजी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केल्याचे नुकतेच आपल्या वाचनात आले. डांबर उपलब्ध करावा हे काम कंत्रटदारांचे आहे असाही मुद्दा ढवळीकर यांनी मांडला आहे. मी सांगू इच्छीतो की, गोवा सरकार स्वत: डांबराची आयात करणार नाही. पूर्वी गोव्याला डांबर मुंबईहून आणला जात होता. आता विदेशातून डांबर आणावे लागेल, कारण सगळीकडेच तुटवडा आहे. गोवा सरकार एखाद्या एजन्सीची नियुक्ती करणार आहे. भारत पेट्रोलियम किंवा इंडियन ऑयल महामंडळ किंवा अन्य तत्सम कंपन्या देशात पेट्रोल- डिङोलची विदेशातून आयात करतात. त्यांच्याकडूनच डांबराची आयात केली जाईल. मात्र ही एजन्सी सरकार नेमील व मग त्या एजन्सीकडून गोव्यातील कंत्रटदार डांबर खरेदी करतील. एकंदरीत गोवा सरकार या सगळ्य़ा प्रक्रियेत फॅसिलिटेटर म्हणून काम करत आहे, कारण डांबराच्या अभावी गोव्यातील कामे अडून राहू नयेत.