शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सरकार असंवेदनशील, आश्वासनांना चुना; विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 13:20 IST

'पूरग्रस्तांसाठी सरकारने 48 तासात तातडीची मदत आर्थिक मदत देऊन दिलासा द्यायला हवा'

पणजी : सरकारने विधानसभेत दिलेली कोणतीही आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप करीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी हल्लाबोल केला. चतुर्थीपूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्याचे तसेच वीज खात्याने प्रत्येक उपविभागाला ४०० वीज उपकरणे देण्याची ग्वाही दिली होती. परंतु ही आश्वासने वेशीवर टांगली गेली आहेत. चतुर्थीत लोकांनी अंधारात राहावे का, असा सवाल कामत यांनी केला.पत्रकार परिषदेत प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या उपस्थितीत बोलताना कामत म्हणाले की, गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे आणि भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. पुढील पंधरा दिवसात तरी सरकारने फलोत्पादन महामंडळाला अनुदान आणखी वाढवून देऊन लोकांना स्वस्त दरात भाज्या उपलब्ध कराव्यात. खांडेपार येथे अलीकडे जलवाहिन्या कुठून फोंडा आणि तिसवाडी या तालुक्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले, याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली असून राज्यातील पूल, साकव तसेच जलवाहिन्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी केली आहे.

ते म्हणाले की, कुठली जलवाहिनी कुठून कुठे जाते, कुठे पाणी पुरवले जाते याचे कोणतेही नकाशे सरकारकडे उपलब्ध नाहीत ते आधी तयार केले जावेत. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पणजी सारख्या राजधानी शहरासाठी जलाशय नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या सरकारला कोणतेही सामाजिक भान राहिले नाही, असा आरोप करताना कामत म्हणाले की जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी आठ ते दहा दिवस लागावी ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

विरोधी पक्ष म्हणून आम्ही समाजाची निगडी निगडीत प्रश्न विधानसभेत उपस्थित केले होते त्याची उत्तरे त्यावेळी मंत्री देत असतात आणि वेळ मारून देत असतात परंतु ही आश्वासने पाळली जात नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. एलईडी दिवे दिलेले नाहीत, त्यामुळे अंधारात रहावे लागेल चतुर्थी काळात लोकांनी या समस्यांना सामोरे जावे काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

काँग्रेस सरकार सत्तेवर असताना गावाात पिकप, ट्रकमधून स्वस्त दरात भाज्या पुरविल्या जात असत. या मोहिमेचे काय झाले किती पिकप गावागावात जातात, असा सवाल त्यांनी केला राज्यात भाज्यांचे दर आणि कडधान्याचे दर गगनाला भिडले आहेत याची जंत्रीच देऊन ते म्हणाले की, मडगावच्या बाजारात आज तूर डाळ 110 रुपये किलो, चणाडाळ 110 रुपये, उडीद डाळ 90 रुपये किलो, चणे 80 रुपये किलो तर भाज्यांमध्ये ढब्बू मिरची, भेंडी प्रत्येकी 80 रुपये किलो, गाजर 100 रुपये किलो असे दर आहेत हे दर पुढील पंधरा दिवसात आणखी वाढणार आहेत चतुर्थी काळात लोकांना दिलासा देण्याकरिता सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत का, असा सवाल कामत यांनी केला. लोकांना भाज्या-फळे गत सालच्या दरानुसार मिळायला हवीत .यासाठी सरकारने अनुदान वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, राज्यात डेंग्युची प्रकरणे वाढली आहेत त्याबद्दल चिंता व्यक्त करताना कामत म्हणाले की, गोमेकॉ इस्पितळात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यूचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना करायला हव्यात. पूरग्रस्तांसाठी सरकारने 48 तासात तातडीची मदत आर्थिक मदत देऊन दिलासा द्यायला हवा अशी मागणीही कामत यांनी यावेळी केली. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस