शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

साडेपाच कोटींची सरकारी उधळपट्टी

By admin | Updated: February 4, 2015 02:36 IST

पणजी : सरकारी उधळपट्टीचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. पाटो येथे कार्यालयासाठी म्हणून घेतलेल्या महागड्या

पणजी : सरकारी उधळपट्टीचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. पाटो येथे कार्यालयासाठी म्हणून घेतलेल्या महागड्या जागेचे तब्बल साडेपाच कोटी रुपये भाडे फेडले; परंतु वर्षभरात या जागेचा कोणताही वापर सरकारने केला नसल्याचे समाजकार्यकर्ते अ‍ॅड. आयरिश रॉड्रिगीस यांना आरटीआय माहितीतून उघड झाले आहे. कॉम्प्युटर डिलर नीलेश आमोणकर यांच्याकडून सरकारने ही जागा भाड्याने घेतली आहे. १ नोव्हेंबर २०१३ रोजी स्पेसीस या इमारतीतील ४८४१ चौरस मीटर आणि कामत टॉवर्समधील ६१३.२५ चौरस मीटर जागा महिना ४२ लाख ९२ हजार ९०४ रुपये भाड्याने घेण्यात आली. भाड्यात दरवर्षी ३.५ टक्के वाढ करण्याची तरतूदही करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या खासगी इमारतींमध्ये सरकारी कार्यालये आहेत, तेथे मालक पालिका कर भरतात. येथे आमोणकर यांचा हा बोजाही सरकारने उचलल्याचे निष्पन्न झाले आहे. आमोणकर हे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निकटचे म्हणून सर्वज्ञात आहेत, असे आयरिश यांनी म्हटले असून या सर्व प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. पर्रीकर यांच्या निर्देशावरूनच २७ फेब्रुवारी २०१३ रोजी जागेसाठी इच्छाप्रस्ताव मागविणारी जाहिरात करण्यात आली. ६००० ते ७००० चौरस मीटर जागा सरकारला हवी होती. यासाठी दुसरा वैध प्रस्ताव मेसर्स प्रुडेन्शियल ग्रुपचे गौरांग सिनाय सुखटणकर यांचा होता. सुखटणकर हे आमोणकर यांचे नातेवाईक आहेत, असाही आयरिश यांचा दावा आहे. दरम्यान, सर्वसाधारण प्रशासन विभागाचे अवर सचिवपद सांभाळलेल्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, सप्टेंबर २०१३पर्यंत तरी या जागेचा ताबा घेतला नव्हता. नंतर आपली बदली झाल्याने पुढे काय झाले ते माहीत नाही. (प्रतिनिधी)