पणजी - सरकारच्या विविध खात्यांनी कंत्राटावर ज्या टॅक्सी घेतलेल्या आहेत, त्यापैकी ज्या टॅक्सी गेल्या शुक्रवारी कामावर रूजू झाल्या नाहीत, त्यांचे कंत्राट रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.मुख्यमंत्री म्हणाले, की संपावरील पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांसोबत ह्या सरकारी कंत्राटावरील टॅक्सीही बंद राहिल्या म्हणून कारवाई करणार नाही तर कंत्राटातील तरतुदीचे पालन झाले नाही म्हणून कारवाई केली जाईल. सरकारी खात्यांच्या कंत्राटानुसार टॅक्सींनी शुक्रवारीही कामावर रुजू होणो बंधनकारक होते. ज्या टॅक्सी येऊ शकल्या नाही, त्यांचे कंत्राट रद्द करावे लागेल व सरकार ते करील. नेमक्या किती टॅक्सी कामावर रूजू झाल्या नाहीत याची माहिती विविध खात्यांकडे मागितली गेली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, की टॅक्सींसह सर्व वाहनांना स्पीड गवर्नर लावण्याबाबतची पहिली अधिसूचना केंद्र सरकारने 15 एप्रिल 2015 रोजी जारी केली होती. गेल्या मे महिन्यात दुसरी अधिसूचना आली. त्यावेळी आम्ही टॅक्सी व्यवसायिकांना सहा महिन्यांची मुदत देण्याचा धोका पत्करला. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या म्हणण्यानुसार केंद्राला कायदा करावा लागला. आम्ही सहा महिन्यांची मुदत टॅक्सी व्यवसायिकांना देऊन न्यायालयीन अवमानाचा धोका पत्करला. अवमान झाला नाही पण तो होऊ शकतो एवढा धोका आम्ही स्वीकारला. कारण टॅक्सी व्यवसायिकांना सहा महिन्यांचा तरी कालावधी स्पीड गवर्नर खरेदी करण्यासाठी मिळायला हवा, असे आम्हाला वाटले होते. आता त्यांनी कोणत्याही डिलरकडील स्पीड गवर्नर लावून घेता येतील. एआयएसक्18 च्या स्टँडर्डप्रमाणो स्पीड गवर्नर लावला की झाले. तुमचे काही मंत्री व आमदार वगैरे आझाद मैदानावर टॅक्सी व्यवसायिकांकडे गेले होते, असे पत्रकारांनी नमूद करताच मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही त्याविषयी त्यांना विचारा. ते का गेले होते, ते मला ठाऊक नाही.ओला-उबेरला संधी ?दरम्यान, संपावर गेलेल्या पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांना लोकांचीही सहानुभूती नाही व त्यामुळे व्यवसायिकांसमोर नमते घ्यायचे नाही असे सरकारने ठरवले असल्याची माहिती सुत्रंनी दिली. टॅक्सी व्यवसायिकांनी सोमवार्पयतही संप सुरू ठेवला तर, ओला-उबेर कंपनीला गोव्यात पाचारण करायचे असे शासकीय पातळीवर तत्त्वत: ठरले आहे. त्याविषयी येत्या दोन दिवसांत सरकारची अधिकृत घोषणा देखील होऊ शकते,असे सुत्रंनी स्पष्ट केले. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी यापूर्वी या घोषणोचे स्पष्ट संकेत दिले आहेतच. बस मालक संपावर जातील अशी अफवा काहीजणांनी उठवली होती पण ते संपावर जाणार नाहीत हे बस मालकांनी स्पष्ट केले आहे.
सरकारी कंत्राटावरील टॅक्सींचे कंत्राट रद्द करणार : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 16:27 IST