शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

खूशखबर! गोव्यातील स्वीमझोन सोमवारपासून पर्यटकांना खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:49 IST

गोव्यातील सर्व समुद्र किना-यावरील स्विमिंग झोन ९ आॅक्टोबरपासून अधिकृतरीत्या खुले होणार आहे. पावसाळ्यात गोव्यात सुरू असलेली समुद्रस्नानाची बंदी ९ आॅक्टोबरपासून उठणार आहे.

मडगाव (गोवा): गोव्यातील सर्व समुद्र किना-यावरील स्विमिंग झोन ९ आॅक्टोबरपासून अधिकृतरीत्या खुले होणार आहे. पावसाळ्यात गोव्यात सुरू असलेली समुद्रस्नानाची बंदी ९ आॅक्टोबरपासून उठणार आहे. गोव्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या दृष्टी लाईफ सेव्हिंग या आस्थापनाने ही घोषणा केली आहे. याचबरोबर पर्यटकांनी समुद्रस्नान करताना घ्यायच्या खबरदारीची सूचीही जाहीर केली आहे.पावसाळ्यात दर्या खवळलेला असल्यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांना समुद्रस्नानास बंदी घालण्यात आली होती. असे असतानाही काही पर्यटक जीव धोक्यात घालून समुद्रात उतरत होते. धोक्याची सूचना देण्यासाठी सर्व किना-यांवर लाल बावटे लावण्यात आले होते. आता ९ आॅक्टोबरपासून हे निर्बंध काढले जाणार आहेत.गोव्यातील ३८ समुद्र किना-यांवर दृष्टीकडून एकूण ६00 जीवरक्षकांची तैनात केली जाणार आहे. त्यातील २२ समुद्रकिनारे दक्षिण गोव्यातील तर १६ समुद्र किनारे उत्तर गोव्यातील आहेत. एरव्ही गोव्यातील इतर समुद्र किना-यावर स्नान करणे धोकादायक नसले तरी हणजुणा समुद्र किनारा खडकाळ असल्याने या किना-यावर आंघोळ करणे एकदम धोकादायक असल्याचे यासंबंधीच्या एडव्हायझरीत नमूद केले आहे. सकाळी ७.३0 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गोव्यातील महत्वाच्या समुद्र किना-यावर जीवरक्षकांची तैनात केली जाईल, असे दृष्टीने कळविले आहे.अशी घ्या खबरदारीसमुद्र किना-यावर स्नान करताना आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवा. जेणे करून कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही. दुपारी १२ ते ४ पर्यंत दर्या खवळलेला असल्याने यावेळी पाण्यात उतरू नका. निर्जन समुद्र किना-यावर किंवा जीवरक्षक तैनात नसलेल्या जागी स्नान करणे टाळा.सुकतीच्या वेळी समुद्रातील दगडावर चढण्याचा धोका पत्करू नका. कारण हे दगड निसरडे असतात. सुरक्षा रक्षकांकडून दिल्या जाणा-या सूचना लक्षपूर्वक ऐका. लाल बावटा असलेल्या जागेत स्नानाला जाऊ नका.या समुद्र किना-यावर असणार जीवरक्षकदक्षिण गोवा : बायणा, बोगमोळो, वेळसांव, होलांट, आरोसी, माजोर्डा, उतोर्डा, बेताळभाटी, कोलवा, बाणावली, ताज बाणावली, वार्का, झालोर, केळशी, मोबोर, आगोंदा, पाळोळे, पाटणे, राजबाग, तळपण, गालजीबाग व पोळे.उत्तर गोवा : केरी, हरमल, आश्र्वे, मांद्रे, मोरजी, वागातोर, अंजुणा, बागा, कळंगूट, कांदोळी, सिकेरी, मिरामार, वायंगिणी —दोनापावल, शिरदोन व बांबोळी.