शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’ मानण्यावर असतात - नितीन गडकरींचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 22:05 IST

‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर असतात. माणूस सायकल मिळाली की, स्कुटर मिळावी अशी अपेक्षा धरतो व स्कुटर मिळाली की कारगाडी मिळावी, अशी अपेक्षा करतो. देशातील गरीब माणसाच्या मनात सुख समाधान नांदत असते; पण श्रीमंत माणसांच्या घरांमध्ये अस्वस्थता असते, असे निरीक्षण केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नोंदविले.

पणजी, दि. 7 -  ‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर असतात. माणूस सायकल मिळाली की, स्कुटर मिळावी अशी अपेक्षा धरतो व स्कुटर मिळाली की कारगाडी मिळावी, अशी अपेक्षा करतो. देशातील गरीब माणसाच्या मनात सुख समाधान नांदत असते; पण श्रीमंत माणसांच्या घरांमध्ये अस्वस्थता असते, असे निरीक्षण केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नोंदविले.गुरुवारी ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीतर्फे आयोजित ‘लोकमत गोवन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यावेळी वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी गडकरी बोलत होते. त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. आपल्या विशिष्ट शैलीत विनोद करत प्रेक्षकांमध्ये हास्य फुलविले. केंद्रात जेव्हा काँग्रेसप्रणित यूपीए सरकारची राजवट होती, तेव्हा देशातील महागाईचा दर 18.8 टक्के होता, तर आता महागाईचा दर केवळ 4 टक्के आहे. कोणीही पंतप्रधान झाला म्हणून लगेच सगळ्या गोष्टी होणार नाहीत. ‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर आणि समाधानावर असतात, असे गडकरी यांनी नमूद केले. पंतप्रधान कोणा खासदाराला बोलू देत नाहीत, हा महाराष्ट्रातील एका खासदाराने केलेला आरोप चुकीचा आहे, असेही मत गडकरी यांनी मांडले.केंद्रीय मंत्र्यांची खाती बदलण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आम्हा चौघा केंद्रीय मंत्र्यांना बसून सर्व मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांचे मूल्यांकन करण्यास सांगितले. त्यानुसार मी, अरुण जेटली, सुषमा स्वराज व राजनाथ सिंग एकत्र बसलो. प्रत्येक मंत्र्याकडील खात्यांचे मूल्यांकन केले व अहवाल पंतप्रधानांना दिला. त्यानंतर कुणाला कोणते खाते द्यावे व कुणाकडून कोणते खाते काढून घ्यावे, हे ठरविण्याचा अधिकार शेवटी पंतप्रधानांचाच असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याबाबतचा निर्णय घेत नाही. संघाचा संबंध येत नाही, असे गडकरी म्हणाले. मला स्वत:ला जल या विषयात खूप रस आहे. मी गेली दहा-बारा वर्षे या विषयी काम करत आलो आहे. त्यामुळे जलसंपदा खाते माझ्याकडे आले, या विषयी आनंद आहे; पण मी ते खाते मागितले नव्हते. तुम्हाला जे काम व्हायला हवे असे वाटते व जे होणे  अशक्य झाले आहे, असे काम माझ्याकडे सोपवा. मी ते दोन वर्षात शक्य करून दाखवतो, एवढेच मी पंतप्रधानांना सांगितले होते. पंतप्रधानांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांनी जलसंपदा खाते देऊन नद्यांच्या स्वच्छतेचेही काम सोपवले आहे. मी ते करून दाखवीन, असे गडकरी म्हणाले. गंगा नदी शुद्ध करण्याची आणि नद्या जोडणी प्रकल्प राबविण्याची संधी मला मिळाली आहे. त्या विषयी मला आनंद वाटतो, असे गडकरी यांनी नमूद केले. सर्वानाच भाजप प्रवेश नाही!विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष मजबूत व्हायला हवा, असे मला वाटते; मात्र राहुल गांधी यांनाच पक्ष विसर्जित करावा, असे वाटत असावे. आम्ही विविध पक्षांमधून येणा-या सर्वानाच भाजपमध्ये घेतले जात नाही. फक्त १० टक्क्यांना घेतले आहे, अजून ९० टक्के प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, अशी मार्मिक टिप्पणी गडकरी यांनी केली.