शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतकीय पारंपरिक कावी कलेला गतवैभव प्राप्त करून देऊ: राज्यपालांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 17:08 IST

राजभवनातर्फे घेण्यात येणार विशेष पुढाकार

विशांत वझे, लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: विस्मृतीत गेलेल्या गोमंतकीय पारंपरिक कावी कलेला पुनर्जिवित केले जाईल. हा समृध्द रसा नव्या पिढीसमोर आणून करण्यासाठी राजभवनातर्फे विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मंदिरात या कलेचे आजही दर्शन घडते आहे. ही कला जोपासण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न असतील, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले. अडवलपाल येथील हनुमान मंदिर परिसरातील कावी कलेची राज्यपालांनी पाहणी केली. शर्वाणी देवीचे दर्शन त्यांनी यावेळी घेतले.

यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, सरपंच, देवस्थान सदस्यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपाल पिल्लई यांनी लामगाव येथील आनंद देसाई यांच्या पुरातन वाड्यास भेट दिली. त्याठिकाणी असलेल्या कावी कलेचे त्यांनी कौतुक केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यपाल म्हणाले की, मी गोव्यातील बहुतांश खेडेगावाला भेट दिली आहे. महात्मा गांधींनी खेड्यांचा विकास होणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. त्याच प्रेरणेने गावांतील पुरातन वास्तूकलांचा अभ्यास करताना लोकांशी संपर्क आला. आज झपाट्याने विकास होताना भारतीय संस्कृती, लोककला, पुरातन वास्तूंचे तितक्याच आत्मियतेनं संवर्धन करताना नव्या पिढीसाठी हा पुरातन खजिना उपलब्ध करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच ध्येयाने कावी कलेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.

राज्यपालांनी गोव्यातील पुरातन वृक्ष संपदेचा, सांस्कृतिक ठेव्याचा विशेष उल्लेख केला. आपल्या लेखनातून गोव्यातील विविध खेडेगाव, वृक्ष, श्वेत कपिला गाय आदींची माहिती संकलित केल्याचे त्यांनी सागितले. ते म्हणाले की, गोवा केवळ सागरी पर्यटनासाठी नाही तर ग्रामीण पर्यटनासाठी विशेष महत्वाचे ठिकाणी आहे. आरोग्य पर्यटनही येथे होऊ शकते. यावेळी आनंद देसाई व देसाई परिवारातील मंडळींनी राज्यपालांचे दिमाखादार स्वागत केले. राज्यपाल सरदेसाई वाडा पाहून खुश झाले. यावेळी रिटा पिल्लई, मिहीर वर्धन, श्री. राव आदी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा