पणजी : जुने गोवा ब्रापूरी येथील प्रसिद्ध श्री गोमंतेश्वर देवस्थानचा ६७ वा वर्धापनदिन रविवार दि. ११ रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काही निवडक यजमानांच्या हस्ते ९ वा. मंदिरात महारूद्र पूजा, त्यानंतर दुपारी आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद होईल. सायंकाळी ५.३० वा. भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम, पालखी अन शेवटी आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. देवस्थानच्या सर्व महाजनांनी व भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आली आहे.
गोमंतेश्वराचा ११ रोजी वर्धापनदिन
By admin | Updated: May 7, 2014 01:02 IST