शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतकीयांना उष्मा झाला असाहाय्य, आरोग्य खात्याकडून जनतेला सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 15:14 IST

हवामान खात्यानुसार यंदाचा एप्रिल महिन्यात उष्णता वाढणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी आरोग्य खात्याने जनतेला काही सूचना जाहीर केल्या आहेत.

- नारायण गावस

पणजी: राज्यात उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून लाेकांना उष्मा आता असाहाय्य झाला आहे. प्रत्येकजण या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत आहेत. हवामान खात्यानुसार यंदाचा एप्रिल महिन्यात उष्णता वाढणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी आरोग्य खात्याने जनतेला काही सूचना जाहीर केल्या आहेत.

नाक्यानाक्यावर शहाळे लिंबू विक्रेते प्रत्येकजण या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लिंबू पाणी तसेच शहाळ्यांच्या पाण्याचे सेवन करत आहेत. त्यामुळे आता शहरापासून गावागावात ठिकठिकाणी शहाळे विक्रेते तसेच लिंबू सरबत करणारे विक्रेते दिसत आहेत. तसेच उसाच्या रसालाही मागणी वाढली आहे. लोकांनी आता चहा कॉफीचे सेवत कमी केल्याने अशा थंडपेयांना मागणी वाढली आहे. तसेच आता शीतपेय लोक कमी पीत आहेत. उन्हाळ्याचा बचावासाठी फळांचा रस उपयोगी ठरत आहे. त्यामुळे आता लिंबू, कोकम, कलिंगण, शहाळे, यांच्या किमती वाढलेल्या आहे.

कौलारूच घरे चांगली म्हणण्याची आली वेळआता विकासाच्या नावाखाली लोकांनी कौलारू घरे पाडून काँक्रेटची घरे बांधली पण यात हाेत असलेल्या प्रचंड उष्णतेमुळे अशा कॉँक्रेटच्या घरामध्ये राहणे लोकांना कठोर शिक्षेप्रमाणे प्रमाणे झाले आहे. एसी शिवाय या घरात राहणे अशक्य आहे. त्यामुळे सध्या एसींनाही मागणी वाढली आहे. बहुतांश लाेकांनी कौलारू घरे माेडन दिखाव्यासाठी माेठी कॉँक्रेटची घरे बांधली आहे. पण हात असलेली प्रचंड उष्णता पाहून लोकांना कौलारूच घरे चांगली हाेती म्हणण्याची वेळ आली आहे.

लोकांची पसंती फार्महाऊसनावाढत्या उष्णतेमुळे आता बहुतांश लाेक आपली आठवड्याची सट्टी फार्महाऊसवर घालवत आहे. निसर्गाच्या अशा या ठिकाणी सुट्टीचा लाेक आनंद घेत आहेत. समुद्र किनारी सध्या प्रचंड उष्णता होत असल्याने ग्रामिण भागातील फार्महाऊसना आता मागणी वाढली आहे. त्यामुळे बहुतांश पर्यटक सत्तरी, फाेंडा, काणकोण, केपे, सांगे, या ग्रामीण तालुक्यामधील फार्महाऊसमध्ये जात आहेत.

टॅग्स :goaगोवा