शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
2
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
3
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
4
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
5
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
7
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
8
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
9
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
10
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
11
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
12
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
13
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
14
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
15
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
16
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
18
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
19
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांचा राजीनामा

By किशोर कुबल | Updated: November 21, 2023 13:02 IST

राजीनामापत्र सादर केल्यानंतर आमोणकर यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त करताना असे म्हटले आहे की, 'ज्याला अकादमीसाठी वेळ देता येईल व कोणावरही अवलंबून न राहता चांगल्या प्रकारे लिहिता व वाचता येते अशाच व्यक्तिने या पदावर राहायला हवे.

- किशोर कुबल

पणजी : गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. उपाध्यक्षांकडे त्यांनी आपले त्यागपत्र पाठवले आहे. 'लोकमत'ने आमोणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. "मी माझ्या व्यवसायात व्यस्त असल्याने अकादमीच्या कामाला वेळ देऊ शकत नाही तसेच नवीन योग्य अशा उमेदवारास अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळावी म्हणून मी राजीनामा देत आहे", असे त्यांनी सांगितले.

आमोणकर यांनी पुढे असेही नमूद केले की, कार्यकारिणीने संपूर्ण विश्वास व पूर्ण सहकार्य केल्यामुळेच मराठी भवनची बरीच कामे आम्ही मार्गी लावू शकलो. आमच्या कार्यकाळात फक्त रंगरंगोटीच नाही तर मराठी भवन वास्तूची बरीच डागडूजीही केली.  कोमूनिदाद जागेचे  “फोर”चे पैसे स्वीकारत नव्हते आम्ही प्रयत्न करुन कार्यकारिणीला आमचे 'फोर'चे पैसे घ्यायला लावले व 'नो ड्यू सर्टीफीकेट' पण द्यायला लावली. 

दुसरी बाब म्हणजे इमारतीचा परवाना २००२ सालीच संपला होता. या परवान्याच्या नुतनीकरणाला सुरवातीला स्थानिक पंचायतीने पत्र पाठवून विरोध केला होता व फेरपरवान्यासाठी नगर नियोजन मंडळाकडे नवीन अर्ज व नवीन आराखडा तयार करायला सांगतले होते व या कामासाठी आजच्या घडीला कमीत कमी ६० ते ६५ लाख रुपये परवाना फी भरावी लागली असती. आम्ही प्रयत्न करुन ५ लाख रुपयांपेक्षाही कमी खर्चात नूतनीकरण करुन घेतले.

सर्वात महत्वाचे म्हणजे संस्था नोंदणी नूतनीकरण २००७ पासून रखडले होते व सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकले नसते. हे काम करुन घेतले. वरील कामे करताना अकादमीच्या पैशाने कधीच कुणाला लांच वगैरे दिली नाही अथवा कुठल्याही सदस्याने एक रुपयादेखील जेवणासाठी किंवा इंधन खर्चासाठी घेतला नाही. अध्यक्ष या नात्याने सर्व व्यवहार पारदर्शक ठेवले.  अकादमीचे वाचनालय व कार्यालय परत लोकांसाठी सुरू केले. मला एकच मोठी खंत सतावत होती ती म्हणजे मी माझ्या कार्यकाळात अकादमीचे खास काही कार्यक्रम करू शकलो नाही.

राजीनामापत्र सादर केल्यानंतर आमोणकर यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त करताना असे म्हटले आहे की, 'ज्याला अकादमीसाठी वेळ देता येईल व कोणावरही अवलंबून न राहता चांगल्या प्रकारे लिहिता व वाचता येते अशाच व्यक्तिने या पदावर राहायला हवे. शेवटी त्यांनी मराठी अकादमीचा सदस्य व नंतर अध्यक्ष म्हणून सेवा करायची संधी दिल्याबद्दल सर्वांचे व खास करून नरेंद्र आजगावकर यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, आपला राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही, असे आमोणकर यांनी 'लोकमत'ला सांगितले. ते म्हणाले की, हा आमचा अंतर्गत मामला आहे. नवीन अध्यक्षाची निवड झाल्यानंतर मी नव्या अध्यक्षासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे.

टॅग्स :goaगोवा