शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या दाबोळी विमानतळावर दूबईहून आलेल्या प्रवाशाकडून ३३ लाखांचे तस्करीचे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 23:33 IST

विमानतळावर कस्टम विभागाची कारवाई; तपास सुरू

वास्को: पहाटे दुबईहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘इंडिगो’ विमानातील एका प्रवाशाकडून येथील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३३ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. त्या प्रवाशाने ६१० ग्राम तस्करीचे सोने द्रव्य पद्धतीने थैलीत (पाऊच) लवपून आणल्याबरोबरच अन्य दोन २११ ग्राम वजनाच्या सोन्याच्या सरपळी आणल्या असून येथून तो चकमा देऊन पोबारा काढण्याच्या प्रयत्नात होता, मात्र सतर्क कस्टम अधिकाऱ्यांमुळे त्याचा हा बेत फसला. कस्टम अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाकडून एकूण ८२१ ग्राम तस्करीचे सोने जप्त केल्यानंतर त्याच्याविरुद्ध कस्टम कायद्याखाली कारवाई करत त्याला अटक केली.शनिवारी पहाटे दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने ही कारवाई केली. दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या विमानातील प्रवाशांची तपासणी चालू असताना कस्टम अधिकाऱ्यांना एका पुरूष प्रवाशावर त्याच्या हालचालीवरून दाट संशय निर्माण झाला. यावेळी येथे उपस्थित कस्टम विभागाच्या सहाय्यक आयुक्त जुलीयेट फर्नांडीस यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टम अधिकाऱ्यांनी संशय निर्माण झालेल्या त्या प्रवाशाला बाजूला घेऊन त्याच्याशी कसून चौकशी करण्यास सुरवात केली. तसेच त्याची झडती घेतली असता त्यांने घातलेल्या अंतवस्त्रात तस्करीचे सोने लपवून आणल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कस्टम अधिकाºयांनी त्याप्रवाशाकडून थैलीत लपवून द्रव्य पद्धतीने आणलेले ६१० ग्राम सोन्यासहीत अन्य दोन सोन्याच्या सरपळी (एक ९८ ग्राम तर दुसरी ११३ ग्राम) पंचनामा करून जप्त केल्या. त्या प्रवाशाकडून जप्त केलेल्या तस्करीच्या सोन्याची एकूण किंमत ३३ लाख ६ हजार ९७ रुपये असल्याची माहिती कस्टम विभागातील सूत्रांनी दिली. तसेच कस्टम कायद्याखाली त्या प्रवाशाला अटक करण्यात आलेली असल्याची माहिती प्राप्त झालेली असून याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून अजूनपर्यंत दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने जप्त केले १ कोटी ४४ लाख रुपयांचे तस्करीचे सोनेदाबोळी विमानतळावर १ एप्रिल २०२० ते अजूनपर्यंत (या आर्थिक वर्षात) कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत ३ कीलो ३३६ ग्राम तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहीती कस्टम विभागाचे आयुक्त मिहीर रंजन यांनी दिली. जप्त केलेल्या या तस्करीच्या सोन्याची एकूण किंमत १ कोटी ४४ लाख रुपये असल्याची माहीती त्यांच्याकडून प्राप्त झाली.

टॅग्स :GoldसोनंSmugglingतस्करी