शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जमीन घोटाळा प्रकरणात राजकारण्यांची दुसरी यादी 50 पट मोठी, गोंयचो आवाज संघटनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 17:00 IST

14 राजकारण्यांनी बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रुपांतर केल्याच्या आरोपावरुन सध्या गोव्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

मडगाव :  2021 च्या प्रादेशिक आराखड्याचा फायदा घेऊन 14 राजकारण्यांनी बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रुपांतर केल्याच्या आरोपावरुन सध्या गोव्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच हा आरोप करणाऱ्या ‘गोंयचो आवाज’ या संघटनेने या संदर्भातील दुसरी राजकारण्यांची नवीन यादी लवकरच जाहीर करु असे प्रतिआव्हान दिले आहे. ही यादी पूर्वीच्या यादीपेक्षा 50 पट मोठी असेल असाही दावा करण्यात आला आहे.

या संघटनेचे सहनिमंत्रक कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांनी शनिवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वी ज्या 14 राजकारण्यांवर जमीन रुपांतरांचे आरोप केले गेले आहेत त्या सर्वानी आपल्यावरील आरोप नाकारीत गोंयचो आवाज संघटनेवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या संघटनेने ही घोषणा केली आहे. आपल्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केल्यास त्याला आम्ही सामोरे जाऊ असेही फर्नाडिस यांनी सांगितले.

गोंयचो आवाज या संघटनेने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समिती समोर आरोपकत्र्यानी आपले पुरावे द्यावेत असेही आवाहन करण्यात आले आहे. मात्र या समितीवर आमचा विश्र्वास नसल्याने त्या समितीसमोर आम्ही जाणार नाहीत. हा जमीन घोटाळा खनिज घोटाळ्यापेक्षाही मोठा असून त्याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमून न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी गोंयचो आवाज संघटनेने केली आहे.