शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

गोव्याचा मोह काही सुटेना, ‘कोविड’ संकटातही तुरळक पर्यटक ; हॉटेल्स बंदच असल्याने परवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 13:54 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून आलेल्या या दोघांनी पत्रादेवी चेक नाक्यावरुन शुक्रवारी सायंकाळी गोव्यात प्रवेश केला

पणजी : ‘कोरोना’च्या संकटातही देशी पर्यटकांमध्ये ‘जीवाचा गोवा’ करण्याचा सोस काही कमी झालेला नाही. शेजारी महाराष्ट्रातून आलेले दोन तरुण पर्यटक गोव्यात हॉटेल शोधतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हे सत्य पुढे आले आहे. परप्रांतातून गोव्यात प्रवेश करणाºयांसाठी शिष्टाचार प्रक्रियेचे खरोखरच कठोरपणे पालन केले जात आहे की नाही असा प्रश्न यावरुन उपस्थित होतो. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून आलेल्या या दोघांनी पत्रादेवी चेक नाक्यावरुन शुक्रवारी सायंकाळी गोव्यात प्रवेश केला. त्यांना कोविड चाचणीसाठी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्यांच्या घशातील द्राव चाचणीसाठी घेण्यात आला. दोघेही एसयुव्ही मोटारीने आले होते. संस्थात्मक विलगीकरणासाठी त्यांना कळंगुट येथील रेसिडेन्सीमध्ये नेण्यात आले परंतु तेथे खोल्या उपलब्ध नव्हत्या. व्हिडिओमध्ये या दोघांपैकी एक पर्यटक असे म्हणतो की, खोल्या न मिळाल्याने त्यांना रस्त्यावर रहावे लागले. तो पुढे म्हणतो की, दोन दिवस ठेवणार असे आम्हाला सुरवातीला सांगण्यात आले परंतु आता आम्हाला खोलीही नाही आणि वाºयावर सोडले आहे. अशाने आता आम्ही कोविड पॉझिटिव्ह झाल्यास ती गोवा प्रशासनाची बेजाबदारी ठरेल? यात आमची काय चूक?

गोव्यात पावसाळ्यात गुजरात, दिल्लीहून येणाºया पर्यटकांची संख्या एरव्ही लक्षणीय असायची कारण मे-जूनमध्ये तिकडच्या शाळांना सुट्टी असते. विशेषत: स्वत:च्या वाहनांनीच हे पर्यटक येतात. मान्सूनमध्ये गोव्याला भेट देणाºया हनिमून कपल्सची संख्याही जास्त असते. नव्या जोडप्यांसाठी हनिमूनकरिता गोवा पर्यटन विकास महामंडळ विशेष सवलतीही जाहीर करीत असते. गोव्याचे पर्यटन आता बारमाही झाले आहे. परंतु गेले तीनेक महिने लॉकडाऊनमुळे हे सर्वच बंद होते.  पावसाळ्यात गोव्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येणारे खास पर्यटकही आहेत. सीमा खुल्या झालेल्या असल्याने हे पर्यटक आता येऊ लागतील. 

११0 हॉटेलांचे अर्ज राज्यात पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्त्व करणाºया ‘टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा’ या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की, ‘सरकारने हॉटेलमालकांना फॉर्म भरुन देण्यास सांगितल्यानंतर सुमारे ११0 हॉटेलमालकांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी मागितली आहे. सुरवातीला सरकारने ए आणि बी वर्गवारीतील हॉटेले तरी सुरु करायला द्यावीत. अजून एकही हॉटेल सुरु होऊ शकलेले नाही. देशांतर्गत विमानसेवा सुरु झाल्याने आता देशातील पर्यटक येतील परंतु त्यांची संख्या अगदीच कमी असेल. सरकारने हॉटेलांमधील व्यवस्था तपासून जी हॉटेल्स मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करु शकतील, अशा हॉटेलांना परवानगी द्यायला हवी. नपेक्षा हा व्यवसाय सुरुच होऊ शकणार नाही. स्वत:च्या वाहनांनी येणाºया पर्यटकांना हॉटेल शोधत बसावे लागेल. दुसरी बाब म्हणजे जो पर्यटक गोव्यात आल्यानंतर २ हजार रुपये भरुन कोविड चाचणी करतो आणि अहवाल निगेटिव्ह येतो त्याला गोवा सफरीसाठी कोणी अडविण्याचा प्रश्नच येत नाही.’

एसओपीमध्ये बºयाच अटी : हॉटेलमालकअखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष तथा शहरातील ‘मनोशांती’ हॉटेलचे मालक गौरीश धोंड म्हणाले की, सरकारने पर्यटकांसाठी एसओपी जारी केलेला आहे. गोव्यात आल्यानंतर कुठल्या हॉटेलमध्ये उतरणार, किती दिवस राहणार वगैरे माहिती पर्यटकांनी द्यावी लागणार आहे. एसओपीमध्ये बºयाच अटी घालण्यात आलेल्या आहेत त्या व्यवसायिकांनाही परवडणाºया नाहीत त्यामुळे तारांकित हॉटेल्स अजून सुरु झालेली नाहीत. काही गेस्ट हाऊसवाल्यांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्ज केला असावा. दुसरी बाब म्हणजे गोव्यात येणारे पर्यटक अनेकदा खाजगी फ्लॅटमध्येही राहतात. अनेक कंपन्यांचे फ्लॅट आहेत तेथेही राहतात. हॉटेले उघडली तरी तेवढ्या प्रमाणात पर्यटक नसल्याने सर्व खोल्या रिकाम्याच राहतील. रिसेप्शनीस्ट, वेटर, सुरक्षा रक्षक, साफसफाईसाठी कामगार ठेवावे लागतील. उत्पन्न काही नाही आणि उलट कामगारांवर खर्च अशी स्थिती होईल.’                महाराष्ट्र हद्द सील करा        - आमदार रोहन खंवटे यांची मागणी 

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गोवा-महाराष्ट्र हद्द सील करावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातून गोव्यात येणाºयांमध्येच अधिक पॉझिटिव्ह आढळत असल्याने प्रधानमंत्र्यांनी हस्तक्षेप करुन हद्द सील करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. खंवटे म्हणतात की, ‘मुंबई, पुणे या महानगरांमध्ये ‘कोरोना’ने थैमान घातलेले आहे. शेजारी महाराष्ट्रातून गोव्यात येणाºयांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे कठोर उपाय करावे लागतील.’ 

टॅग्स :goaगोवाhotelहॉटेल