शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचा 1400 कोटींचा महसुल बुडाला, पॅकेज द्या, मुख्यमंत्र्यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 19:23 IST

खाण बंदीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे, असा मुद्दा सावंत यांनी मांडला.

पणजी : खनिज खाण बंदीमुळे गोव्याचा एकूण 1 हजार 400 कोटींचा महसुल बुडाला आहे. त्यामुळे गोव्याला विशेष पॅकेज दिले जावे, अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली. इफ्फीसाठी साधनसुविधा उभ्या करणो तसेच गोव्यात आरोग्य आणि शैक्षणिक हब निर्माण करणो यासाठी केंद्राने मदत करावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.अर्थमंत्री सितारामन यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व अर्थ मंत्र्यांची बुधवारी बैठक घेतली व त्यांच्याशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. केंद्राकडून यापुढे संसदेत जो अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, त्याविषयी राज्यांच्या अपेक्षा सितारामन यांनी जाणून घेतल्या. मुख्यमंत्री सावंत हेही या बैठकीत सहभागी झाले. गोव्यासह हरियाणा व पाँडिचेरीचे मुख्यमंत्री तसेच अरुणाचल प्रदेश, बिहार, दिल्ली, तामिळनाडू आणि त्रिपुराचे उपमुख्यमंत्री व 17 राज्यांचे अर्थ मंत्री आणि केंद्रीय अर्थ मंत्रलयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले. विकास, गुंतवणूक, पायाभूत साधनसुविधा आणि वीत्तीय धोरणाविषयी विविध राज्यांचे अर्थ मंत्री व मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केल्या.गोव्याच्या विविध अपेक्षा खाण बंदीमुळे राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे, असा मुद्दा सावंत यांनी मांडला. गोव्याच्या लोकसंख्येपेक्षा पाचपट जास्त पर्यटक गोव्यात येतात. यामुळे पर्यटन क्षेत्रतील साधनसुविधांसमोर आव्हान उभे राहते. ग्रामीण भागातील पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एखाद्या प्रकल्पासाठी मदत करावी. गोवा हे इफ्फीचे कायमस्वरुपी केंद्र बनलेले आहे. तथापि, आर्थिक अडचणींमुळे इफ्फीला आवश्यक अशा साधनसुविधा उभ्या करता आल्या नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कनवेनशन सेंटरसारख्या सुविधा उभ्या करण्यासाठी केंद्राने विशेष अनुदान द्यावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. गोव्यात शैक्षणिक व आरोग्य हब निर्माण करता येते. त्यासाठी आयआयएम, राष्ट्रीय कायदा महाविद्यालय, एम्स यासारख्या संस्था आणता येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन