शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेला सहकुटुंब गेलेले गोव्याचे मंत्री, आमदार परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 22:09 IST

पर्यटन खात्याने यापूर्वीच्या काळात विदेशात अनेक रोड शो व प्रदर्शने केली आहेत. मी विदेशातील सोहळ्यांचे हे प्रमाण कमी केले व रोड शोवरील खर्चातही कपात केली.

पणजी : पर्यटन खात्याने यापूर्वीच्या काळात विदेशात अनेक रोड शो व प्रदर्शने केली आहेत. मी विदेशातील सोहळ्यांचे हे प्रमाण कमी केले व रोड शोवरील खर्चातही कपात केली. माझे कुटुंबीय माझ्यासोबत अमेरिकेच्या दौ-यावर गेले म्हणून काही जणांनी आक्षेप घेतला. तो आक्षेप निराधार आहे. दौरा यशस्वी ठरला आहे. मी दलित समाजातून आलेलो असल्याने माझ्या दौ-याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह अन्य काही जणांनी आक्षेप घेतला, असा दावा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी अमेरिकेहून गोव्यात परतल्यानंतर केला आहे.अमेरिकेत पर्यटन खात्याने रोड शो आयोजित केला होता. मंत्री आजगावकर यांच्यासोबत त्यांचे बंधूू वगैरे अमेरिकेला गेले होते. पर्यटन खात्याचे उपसंचालक व राज्याचे मुख्य सचिवही शासकीय शिष्टमंडळाचा भाग बनून अमेरिकेला गेले होते. कुडचडेचे आमदार निलेश काब्राल हे पर्यटन महामंडळाचे चेअरमन या नात्याने सहकुटुंब अमेरिकेच्या दौ-यावर होते. तथापि, मंत्री आजगावकर यांचे सहकुटुंब अमेरिकेला जाणे गाजले. याविषयी आजगावकर यांना लोकमतने विचारले असता, ते म्हणाले की माझ्या कुटुंबाचे सदस्य माझ्यासोबत अमेरिकेला गेले होते यात काहीच वाईट नाही. मला कुणी तरी कुटुंबातीलच सदस्यांनी कंपनी द्यावी असे वाटल्यामुळे मी त्यांना सोबत नेले होते. ते स्वत:च्या क्षमतेने अमेरिकेला आले. माझ्या कुटुंबातील सदस्य हे मोठ्या हुद्यावर आहेत. माझा भाऊ व्यवसायाने डॉक्टर आहे आणि माझ्यासोबत आलेली कुटुंबाची अन्य सदस्य ही अबकारी खात्यात अधीक्षक आहे. त्यांच्याकडे स्वखर्चाने अमेरिकेला जाण्याची क्षमता आहे. उगाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व इतर कुणी बाऊ करू नये.मंत्री आजगावकर म्हणाले, की यापूर्वी अनेक पर्यटन मंत्री विदेशात रोड शोनिमित्ताने जाऊन आले आहेत. मी शासकीय शिष्टमंडळाचा भाग बनून गेलो होतो. मी दलित समाजातून वर आलो आहे. मी दलित असल्यानेच माझ्या अमेरिका दौ-यावर काही जणांनी टीका केली पण मी अशा टीकेची पर्वा करत नाही. गोव्याचे पर्यटन वाढावे म्हणून आम्ही अमेरिकेत रोड शो आयोजित केला. यापूर्वी रोड शो व प्रदर्शनांवर जसा खर्च होत होता तसा आता होत नाही. मी खूप कपात केली आहे. आम्ही दलित समाजातील लोकांनी यापूर्वी खूप अन्याय व अत्याचार भोगलेला आहे. आमचे नेहमी शोषणच झाले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी माझ्यावर विश्वास दाखवला व मला पर्यटन मंत्री केले. आम्ही आता विदेश दौरा वगैरे करतो हे पाहून काही जणांच्या पोटात दुखते. मात्र त्याला ईलाज नाही. काँग्रेसमधील काही जण हे खंडणीबहाद्दर आहेत. त्यांनी माझ्यावर टीका केल्याचे मला कळाले आहे.

टॅग्स :goaगोवा