शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या उद्योगपतींचे खासगीत मोदीविरोधी, तर इतरांसमोर स्तुतीचे सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 12:36 IST

गोव्यातील कोटय़धीश असे जे उद्योगपती आहेत, ते एकत्र येतात तेव्हा नेमके काय बोलतात व व्यक्तीगत पातळीवर बोलायचे झाले तेव्हा नेमका कोणता संवाद साधतात हे कळायचे असेल तर कुणीही एखाद्या बडय़ा उद्योगपतीच्या सोहळ्य़ात सहभागी व्हावे.

पणजी : गोव्यातील कोटय़धीश असे जे उद्योगपती आहेत, ते एकत्र येतात तेव्हा नेमके काय बोलतात व व्यक्तीगत पातळीवर बोलायचे झाले तेव्हा नेमका कोणता संवाद साधतात हे कळायचे असेल तर कुणीही एखाद्या बडय़ा उद्योगपतीच्या सोहळ्य़ात सहभागी व्हावे. मंगळवारी रात्री गोव्यातील अनेक बडे उद्योगपती पणजीतील सोहळ्य़ात एकत्र आले. पणजीतील एका हॉटेलमध्ये एका ज्येष्ठ उद्योजकाचा वाढदिन सोहळा होता व त्यावेळी डिनरचा आस्वाद घेताना काहीजण एकमेकांशी खासगीत काय बोलत होते व एकत्र आल्यानंतर काय बोलत होते याचे वर्णन लोकमतच्या प्रतिनिधीना त्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या काही छोटय़ा उद्योजकांकडून ऐकायला मिळाले.

त्या डिनरमध्ये सुमारे दोनशे छोटे- मोठे उद्योजक सहभागी झाले. एकही मंत्री किंवा आमदार नव्हते. एका महत्त्वाच्या राजकारण्याची पत्नी तेवढी होती. अन्य काही प्रतिष्ठीत महिला होत्या. ज्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 10 कोटी रुपये आहे असे किमान दहा उद्योगपती या पार्टीला उपस्थित राहिले. खनिज खाण व्यवसाय, हॉस्पिटेलिटी, पर्यटन, फार्मास्युटीकल, आयटी, वैद्यकीय अशा उद्योगधंद्याशी ज्यांचा संबंध आहे असेही अनेक उद्योजक डिनरला होते. गोव्यासह देशात सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने साहजिकच प्रत्येकजण जेवताना देशातील राजकीय स्थिती, गोव्यातील स्थिती व गोव्याचे राजकीय भविष्य याविषयी खासगीत चर्चा करत राहिले. रात्र जसजशी पुढे सरकत राहिली, तसतसे ग्लास ग्लासाला भिडू लागले. 

सोहळा चांगलाच झाला. जेव्हा दोघे उद्योजक एकमेकांशी बोलायचे तेव्हा त्यांनी वेगळा सूर लावला व जेव्हा पाच-सहा उद्योगपती एकत्र आले तेव्हा त्यांनी वेगळा सूर लावला, असे पार्टीत सहभागी झालेल्या दोघा उद्योजकांनी तरी लोकमतला सांगितले. एकमेकांशी बोलताना उद्योजक गुप्तपणो मनातील गोष्टी बोलू लागले. काहीजणांना अदानी- अंबानींचे वैभव खुपते हेही चर्चेतून कळून आले. केंद्रातील सरकार अदानी- अंबानींच्या हाती गेले, पाच विमानतळ एकाच कंपनीला मिळतात वगैरे चर्चा आपआपसांत झाली. मात्र हेच सगळे उद्योजक जेव्हा डिनरवेळी मग पाच-दहाजणांच्या गटात सहभागी झाले तेव्हा या गटाचा सूर पूर्ण वेगळा झाला. मोदी यांच्यातच खरी धमक आहे, आम्ही मोदींसोबतच आहोत, मोदींमुळेच अर्थव्यवस्था भविष्यात सुधारेल अशा प्रकारच्या गोष्टी उद्योजकांच्या गर्दीमध्ये रंगल्या.

कोणी मोदींना जाऊन सांगितले तर...

अशा प्रकारे दोन सूर लावण्यामागिल कारण काय असावे असे लोकमतच्या प्रतिनिधीने एका उद्योजकाला विचारले तेव्हा इंटरेस्टींग उत्तर मिळाले. भीती. फियर. खासगीत काहीही बोलता येते पण पाच-दहा उद्योजकांमध्ये आम्ही बोलतो तेव्हा मोदींविषयी व भाजप सरकारविषयी सकारात्मक किंवा चांगलेच बोलावे लागते, अन्यथा आम्ही असे बोलत होतो असे मोदींना कुणी तरी सांगेल ही भीती गोमंतकीय उद्योजकांमध्येही आहे असे एक उद्योजक म्हणाले.

टॅग्स :goaगोवाNarendra Modiनरेंद्र मोदी