शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षासाठी पर्यटकांची गोव्यालाच प्रथम पसंती

By admin | Updated: December 26, 2014 02:10 IST

पणजी : नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती गोवाच आहे. रशियन चलनाचे दर घसरल्याने विदेशी पर्यटकांची संख्या घटली असली तरी देशी पाहुणे मात्र मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झालेले आहेत.

पणजी : नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती गोवाच आहे. रशियन चलनाचे दर घसरल्याने विदेशी पर्यटकांची संख्या घटली असली तरी देशी पाहुणे मात्र मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झालेले आहेत. किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नाताळच्या पूर्वसंध्येपासून पार्ट्यांची धूम सुरू झालेली आहे. पर्यटन विशेष रेल्वे २९ पासून मुंबई-गोवा पर्यटकांसाठी असलेली विशेष रेल्वे २९ रोजी रात्री ११ वा. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १0 वा. मडगावला पोहोचेल. सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धावणार असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले. जगभरात प्रसिद्ध सनबर्न पार्टी २७ डिसेंबर रोजी सुरू होणार असून, चार दिवस ती चालणार आहे. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे चौथ्या दिवशी गोमंतकीयांनाही या पार्टीत सहभागी होता येईल. नववर्ष साजरे करण्यासाठी सिनेकलाकार, राजकीय नेते गोव्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस येथे सेलेब्रिटींचीही धूम असणार आहे. चार दिवसांचा व्हीएच वन सुपरसोनिक डान्स फेस्टिव्हलही २७ रोजी सुरू होत आहे. आंतरराष्ट्रीय कलाकार पॉल वॅन डिक, डॅश बर्लिन आदी तीत सहभागी होतील. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने गोव्यात येण्याचा आपला बेत जाहीर केलेला आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या दरवर्षी नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येतात. महाराष्ट्राचे अनेक मंत्रीही गोव्यालाच पसंती देतात. आजी-माजी न्यायमूर्तीही नववर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्यात आवर्जून हजेरी लावत असतात. नोकरी, धंद्यानिमित्त मुंबई, पुणे, बंगळुरू, तसेच देशातील इतर भागात आणि विदेशात स्थायिक झालेले गोमंतकीय नाताळाला गोव्यात परततात. राज्यात नाताळची धामधूम सुरू झाली आहे. खासगी, तसेच गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेल्सचे आरक्षण फुल्ल झालेले आहे. उत्तर भारतीय पर्यटकांची संख्या जास्त आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याला विचारले असता ते म्हणाले की, नाताळ, नववर्षाच्या काळातच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या आठ लाखांवर जाते. आॅक्टोबरमध्ये विकएंडला सलग सुट्ट्या आल्याने पर्यटकांची संख्या इतकी वाढली की, नाताळ, नववर्षातील पर्यटकांचा विक्रमही तोडला गेला. (प्रतिनिधी)