शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील नारळाचे उत्पादन संकटात, आंबा व फणसांच्या झाडांनाही धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 16:47 IST

गोवेकरांच्या अन्नातील मुख्य घटक असलेला नारळ कमी पिकत असताना आता नारळांच्या झाडांना माईट (व्हाईटफ्लाय) या माशीचा फटका बसल्याने गोव्यातील बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देगोवेकरांच्या अन्नातील मुख्य घटक असलेला नारळ कमी पिकत असताना आता नारळांच्या झाडांना माईट या माशीचा फटका बसल्याने गोव्यातील बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.पिलार, ओल्ड गोवा, बेताळभाटी आणि मडगावातील बागायतीत या माईटचा त्रास जाणवू लागला आहे.नारळाचेच पीक नव्हे तर इतर फळांचेही पीक धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मडगाव - गोवेकरांच्या अन्नातील मुख्य घटक असलेला नारळ कमी पिकत असताना आता नारळांच्या झाडांना माईट (व्हाईटफ्लाय) या माशीचा फटका बसल्याने गोव्यातील बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. विशेषत: पिलार, ओल्ड गोवा, बेताळभाटी आणि मडगावातील बागायतीत या माईटचा त्रास जाणवू लागला असून त्यामुळे नारळाचे उत्पादन अधिकच कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ओल्ड गोवा येथील भारतीय कृषी अनुसंधानच्या कार्यालयात यासंबंधीच्या तक्रारी आल्या असून विशेषत: किनारपट्टी भागात या माशींचा प्रादुर्भाव अधिक दिसू लागला आहे. याशिवाय हमरस्त्याच्या बाजूला असलेल्या नारळांच्या झाडांवरही या माशांचा हल्ला झालेला दिसून येत आहे. कृषी खात्याकडे अद्याप या संबंधीची नेमकी माहिती नसली तरी हा प्रादुर्भाव बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झाल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.

माईट ही सुमारे दोन मि.मी. आकाराची माशी असून फिकट पिवळ्या रंगाच्या या माशीचे पंख पांढरे असतात त्यामुळे तिला व्हाईटफ्लाय असेही म्हटले जाते. ही माशी नारळाच्या मुळावरच आघात करुन झाडातील पाणी शोषून घेते. त्यामुळे नारळांच्या वाढीवर त्याचा दुष्परिणाम होतो. काही वर्षापूर्वी माईटच्या या हल्ल्यामुळे गोव्यातील नारळाचे उत्पादन निम्म्याने कमी झाले होते. आता पुन्हा एकदा तशी स्थिती निर्माण तर होणार नाही ना अशी भीती व्यक्त केली जाते. ही माशी नारळाप्रमाणेच सुपारी, केळी, पेरु, आंबा आणि फणसांच्या झाडावरही हल्ला करते. त्यामुळे केवळ नारळाचेच पीक नव्हे तर इतर फळांचेही पीक धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गोव्यात वाढलेल्या बांधकाम व्यवसाय या माशींचे प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत असल्याचे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. बांधकाम साईटवरच अशा माशा वाढतात. सुरुवातीला रस्त्याच्या बाजूच्या झाडांवर त्यांचा हल्ला होतो. त्यानंतर हळूहळू ही माशी दुसरीकडेही पसरते अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली.

गोव्यातील आघाडीचे नारळ उत्पादक असलेले सुळकर्णा-केपे येथील प्रवास नाईक यांनी माईटमुळे नारळाचे उत्पादन बऱ्याच प्रमाणावर घटल्याचे मान्य केले. ते म्हणाले, सुरुवातीला हा प्रादुर्भाव कर्नाटकातील म्हैसूर आणि काही प्रमाणात केरळातून सुरू झाला होता. या माशींची लागण झाल्यामुळे आम्हाला कित्येक नारळांची झाडेही कापून टाकावी लागली असे त्यांनी सांगितले.

वास्तविक अशा माईट माशींचा लाल मुंग्या नाश करतात. मात्र बागायतदारांकडून रासायनिक फवारणी झाडावर केली जात असल्याने या लाल मुंग्याही कमी झाल्या आहेत त्यामुळेच माईटची माशी फोफावली असल्याचे सांगण्यात आले. या माशीचा नाश करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर फारसा प्रभावी ठरत नसून त्याऐवजी नीम तेलाची फवारणी बागायतदारांनी करावी अशीही सूचना कृषी खात्याकडून करण्यात आली आहे. गोव्यात कित्येककडे या माशींचा नाश करण्यासाठी झाडांना मिरचीचा धुरही दिला जात असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरी