शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

 सिक्कीम पाठोपाठ गोवाही पूर्णत: ऑर्गेनिक राज्य करण्याचे लक्ष्य - विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 17:41 IST

ऑर्गेनिक शेती हा सध्या जगभरात परवलीचा शब्द झालेला असताना सिक्कीम पाठोपाठ गोवाही पूर्णत: ‘ऑर्गेनिक’ करण्यासाठी राज्यातील कृषी खात्याने पावले उचलली आहेत.

 मडगाव - ऑर्गेनिक शेती हा सध्या जगभरात परवलीचा शब्द झालेला असताना सिक्कीम पाठोपाठ गोवाही पूर्णत: ‘ऑर्गेनिक’ करण्यासाठी राज्यातील कृषी खात्याने पावले उचलली आहेत. ऑर्गेनिक शेतीसाठी गोव्यात ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीनेही गोवा सरकारने इच्छुक कंपन्यांकडून बोली मागविल्या आहेत. गोव्यातील सरकारी कृषी फार्मात हे केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी ‘ऑर्गेनिक शेती’ संदर्भात जागृती करण्यासाठी मडगावात आयोजीत केलेल्या मेळाव्यात ही माहिती दिली. गोव्यातील शेतीची जोड पर्यटन व्यवसायाशी घालून गोव्याच्या ऑर्गेनिक उत्पादनांचे जगभरात ब्रँडींग करण्यावरही सरकार भर देणार आहे. उच्च दर्जाचे पर्यटक गोव्याकडे आकृष्ट व्हावेत यासाठी ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर करण्याची योजना त्यांनी बोलून दाखवली. सरदेसाई म्हणाले, कृषी खात्याकडे असलेल्या कोडार किंवा एला फार्ममध्ये हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रातून उत्कृष्ट दर्जाची ऑर्गेनिक शेती उत्पादने तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. या शेतीत जर कोणी गुंतवणूक करण्यास पुढे येत असेल तर सरकार त्याला मदत करण्याबरोबरच त्याच्या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठीही सहाय्य करेल असे त्यांनी सांगितले.यावेळी गोवा कृषी खात्याचे संचालक नेल्सन फिग्रेदो तसेच दक्षिण गोव्यातील उपसंचालक नेवील आफोन्सो यांच्यासह शिरोडय़ातील शेती व्यवसायीक असलेले अकबर मुल्ला हे उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाagricultureशेती