शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी, राज्यात विरोधी युती मजबूत; माणिकराव ठाकरेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:41 IST

आरजी-आपकडून केवळ काँग्रेसच टार्गेट : पाटकर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केवळ आम आदमी पक्षच नव्हे तर रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीदेखील काँग्रेसवर सातत्याने हल्ले करत आहे. केजरीवाल तर गोव्यातील प्रत्येक सभेत काँग्रेसवर टीका करत असून भाजपविरोधात एकही ठोस विधान करत नाहीत. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड वगळता एकही विरोधी पक्ष भाजपवर थेट टीका करत नाही. त्यामुळे हे पक्ष नेमके कोणाच्या फायद्यासाठी काम करत आहेत, हा प्रश्न जनतेला पडला आहे. भाजपविरोधी मतांचे विभाजन करून सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत करण्याचे हे राजकारण आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व पक्षाचे प्रदेश ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख उपस्थित होते. मतदारांनी सजग राहावे, असे आवाहन पाटकर यांनी केले.

दरम्यान, 'काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मजबूत उमेदवार उभे केले आहेत,' असा दावा ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, 'भाजप सरकार लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. बेकायदेशीर नाइट क्लब सुरू करण्यास परवानगी दिली जाते. निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवेल.

मतविभाजनाचा डाव ओळखा : पाटकर

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, 'आम आदमी पक्ष गोव्यात केवळ विरोधी मतांचे विभाजन करण्यासाठी सक्रिय आहे. प्रत्यक्ष फिल्डवर या पक्षाचे काहीच काम दिसत नाही. आपचे कुठलेही ठोस संघटनात्मक कार्य दिसत नाही. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष केवळ विरोधकांची मते फोडण्यासाठी सक्रिय झाला आहे.

आरजीने आघाडी तोडली

विरोधी पक्षांची आघाडी आरजीने उमेदवार यादीवरून तोडल्याचा आरोप काँग्रेसने केला. माणिकराव ठाकरे म्हणाले की, 'आघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेसने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र दोन्ही बाजूंची सहमती आवश्यक असते.

सांताक्रुझ मतदारसंघात काँग्रेसचा झेडपी सदस्य आहे. त्यामुळे या जागेबाबत काँग्रेसने दावा केला. या संदर्भात गोवा फॉरवर्ड, आरजी यांच्यासोबत बैठकही झाली होती. मात्र, आरजीचे मनोज परब यांनी उमेदवार यादी आधीच जाहीर केली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Government Fails Promises; Opposition Unity Strong in State: Manikrao Thackeray

Web Summary : Congress alleges AAP aids BJP by splitting votes. Thackeray claims strong opposition unity for elections as BJP failed on promises, allowing illegal nightclubs.
टॅग्स :goaगोवाLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५congressकाँग्रेसManikrao Thackreyमाणिकराव ठाकरेManikrao Thakareमाणिकराव ठाकरे