शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पर्यटनात गोवा सर्वोत्तम पाच राज्यांच्या यादीत तिसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 18:53 IST

फेसाळते किनारे, ऐतिहासिक चर्च, मंदिरे यामुळे प्रसिध्द असलेला गोवा पर्यटनात सर्वोत्तम पाच राज्यांच्या यादीत आलेला आहे.

पणजी : फेसाळते किनारे, ऐतिहासिक चर्च, मंदिरे यामुळे प्रसिध्द असलेला गोवा पर्यटनात सर्वोत्तम पाच राज्यांच्या यादीत आलेला आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल आणि टुरिझम कौन्सिल-इंडिया इनिशिएटिवने संलग्नितपणे पर्यटनासाठी द्वैवार्षिक रँकिंग सर्वेक्षणात पर्यटनात पहिल्या पाच राज्यांच्या यादीत गोव्याचा तिसरा क्रमांक लागला आहे. दिल्ली आणि महाराष्ट्र ही राज्ये पहिल्या दोन क्रमांकावर आहेत तर तामिळनाडू आणि गुजरातचा त्यानंतर क्रमांक लागतो.पर्यटन उद्योग क्षेत्रातील अकरा महत्त्वाच्या मुद्द्यांचा निकष या सर्वेक्षणात लावण्यात आला. यात पर्यटनातील राज्याचा खर्च, पर्यटकांची संख्या, ब्रँडेड हॉटेल्सची संख्या, जीएसडीपी दर, विमानांची वर्दळ, व्यवसाय करण्यातील सुलभता, शहरीकरण, रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क, विपणन प्रचार आणि इतर महत्त्वाचे घटक यांचा यात समावेश आहे.पर्यटनासाठी राज्याचा खर्च, ब्रँडेड हॉटेल रूम्सची उपलब्धता, जीएसडीपी आणि शहरीकरण या चार निकषांवर गोव्याचा तिसरा क्रमांक लागला. भारतात ब्रँडेड हॉटेल्स पुरवण्यात गोव्याचा दुसरा क्रमांक लागतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे, आणि गेल्या चार सर्वेक्षणात राज्याने हे स्थान कायम ठेवले आहे. या सर्व प्रमुख घटकांमुळे गोवा हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे, पर्यटक, हॉटेल व्यावसायिक आणि प्रशासन अशा सर्वांसाठीच हे प्रमुख केंद्र आहे.दिल्ली किंवा हरयाणापेक्षा गोवा सर्वात आरामदायी ठिकाण झाले आहे, कारण येथे ब्रँडेड हॉटेल रुम्सची उत्तम उपलब्धता आहे, हा अहवाल प्रसिद्ध होत असल्यापासून यात १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. हॉटेल उद्योगक्षेत्रासाठीही येथे किफायतशीर वाढ निदर्शनास आली आहे.पर्यटनावरील राज्याच्या खर्चाच्या बाबतीत गोवा राज्याने २0१६-१७ मध्येमध्ये सर्वात अधिक खर्च केला आहे. 0.६७३ टक्क्यांचा खर्च खास प्रवास आणि पर्यटनासाठी राखून ठेवण्यात आला आहे. गेल्या तीन अहवालांमध्ये सिक्कीमचा पहिला क्रमांक होता, गोव्याला तिसºया क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर यायचे असेल तर सिक्कीम राज्याची जागा घ्यावी लागेल.जीडीपीच्या (एकूण स्थानिक उत्पन्न) निकषात गोवा, दिल्ली आणि सिक्कीम आदींनी देशातील सर्वोत्तम तिसरे स्थान कायम ठेवले आहे. शहरीकरणाच्या मुद्द्यावर दिल्ली, गोवा आणि मिझोरम राज्यांनी असे अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे.पर्यटन मंत्री मनोहर (बाबू) आजगावकर म्हणाले की, पर्यटनाच्या विविध परिमाणांमधून गोवा राज्याने हे यश प्राप्त केले आहे. सर्व निकषांवर अग्रणी बनण्यासाठी आम्ही पराकाष्ठा करत आहोत. राज्यातील पायाभूत सुविधा, गुंतवणुका अधिक वाढवणे व सुधारणे, याशिवाय पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत. गोवा टुरिझम आणि जीटीडीसीने गोवा टुरिझमला ध्येयप् ा्राप्तीसाठी मदत केली. येत्या काही वर्षांत गोवा टुरिझम सर्वच क्षेत्रांतील अग्रेसर पर्यटनाचे क्षेत्र बनणार आहे.'पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल म्हणाले की, ‘गोव्याने पुन्हा एकदा यशाचा टप्पा गाठला आहे. गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनने नेहमीच विविध प्रकारे पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, यात पायाभूत सुविधा, वास्तव्य, पर्यटनाचे उपक्रम, पर्यटनाशी संबंधित विकास आणि इतर गोष्टींसाठी प्रयत्न केले आहेत. स्पर्धकांशी योग्य पध्दतीने स्पर्धा करीत आहोत. ही स्थिती नक्कीच प्रोत्साहित करणारी आहे.’