शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

देशी पर्यटकांच्या पसंतीत गोवा टॉप-10 मधून बाहेर, पहिल्या स्थानावर तामिळनाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 16:08 IST

पर्यटकांचा स्वर्ग अशी गोवा पर्यटन खात्याकडून स्वत:ची जाहिरात केली जाते. मात्र, एका खासगी एजन्सीने केलेल्या सर्व्हेक्षणात गोव्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या पाच राज्यात तिसरा क्रमांक दिला गेला असला तरी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 2017 चा जो अहवाल जारी केला आहे, त्यात देशी पर्यटकांमध्ये गोवा खिजगणतीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मडगाव :  पर्यटकांचा स्वर्ग अशी गोवा पर्यटन खात्याकडून स्वत:ची जाहिरात केली जाते. मात्र, एका खासगी एजन्सीने केलेल्या सर्व्हेक्षणात गोव्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या पाच राज्यात तिसरा क्रमांक दिला गेला असला तरी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 2017 चा जो अहवाल जारी केला आहे, त्यात देशी पर्यटकांमध्ये गोवा खिजगणतीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालात पहिल्या दहा राज्यात गोव्याचे नाव दिसत नाही.2016 साली आलेल्या पर्यटकांच्या आकडेवारीनुसार तामिळनाडू राज्याचा पर्यटन क्षेत्रत अग्रक्रमांक असून एकूण 34.38 कोटी पर्यटकांनी या राज्याला भेट दिली आहे. तर दहाव्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानला 4.14 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. या गटात गोव्याचा उल्लेख इतर राज्यामध्ये करण्यात आला आहे.विदेशी पर्यटकांच्या गटातही गोवा नवव्या क्रमांकावर असून 2016 साली 6.80 लाख विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिल्याचे हा अहवाल म्हणतो. देशातील एकूण टक्केवारीत हे प्रमाण केवळ 2.8 टक्के आहे. या गटात पुन्हा एकदा तामिळनाडूच पहिल्या क्रमांकावर असून दुस-या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. एकूण टक्केवारीत तामिळनाडूला 19.1 टक्के तर महाराष्ट्राला 18.9 टक्के विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्या पाठोपाठ उत्तरप्रदेश, दिल्ली, पं. बंगाल, राजस्थान, केरळ, बिहार असा क्रम असून दहाव्या क्रमांकावर पंजाबची वर्णी लागते.आंतरराष्ट्रीय चेक पोस्ट (विमानतळ) या गटातही गोव्याचा 9 वा क्रमांक आहे. 2016 साली एकूण 2.79 लाख पर्यटकांची येथे नोंद झालेली आहे. एकूण टक्केवारीत हे प्रमाण केवळ 3.17 टक्के आहे. ई-व्हिसा घेऊन आलेल्या पर्यटकांच्या गटात गोव्यातील प्रमाण काही प्रमाणात चांगले आहे. मागच्या वर्षी दाबोळी विमानतळावर 1.03 लाख पर्यटकांनी ई-व्हिसासह भेट दिली असून या गटात गोव्याला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. यातील एकूण टक्केवारी 9.6 टक्के इतकी आहे. साधनसामग्रीच्या बाबतीतही गोवा बराच मागे असून 31 डिसेंबर 2015 र्पयत केरळात 392 तारांकित हॉटेलात 11,114 खोल्यांची नोंद झाली आहे. त्या तुलनेत गोव्यात 44 तारांकित हॉटेलात केवळ 4317 खोल्यांची नोंद झालेली आहे.

टॅग्स :goaगोवा