शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Goa:   विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण, रंगेल पोलीस अधिकाऱ्याकडून विशाखा समन्सना केराची टोपली

By वासुदेव.पागी | Updated: September 4, 2023 18:35 IST

Goa Crime News: विद्यार्थीनींचा लैंगिक छळ प्रकरणातील त्या  रंगेल पोलीस अधिकाऱ्याने गोवा विद्यापीठाच्या विशाखा समितीने चौकशील हजर राण्यासाठी बजावलेले समन्सही जुमानले नाहीत.  एकदाही तो चौकशीला उपस्थित राहिला नाही.

- वासुदेव पागीपणजी - विद्यार्थीनींचा लैंगिक छळ प्रकरणातील त्या  रंगेल पोलीस अधिकाऱ्याने गोवा विद्यापीठाच्या विशाखा समितीने चौकशील हजर राण्यासाठी बजावलेले समन्सही जुमानले नाहीत.  एकदाही तो चौकशीला उपस्थित राहिला नाही.

पोलीस खात्यात शिकाऊ तत्वावर असलेल्या गोवा विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींवर पोलीस अधिकाऱ्याने  लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात विद्यार्थीनींनी तक्रार केल्यानंतर  त्या पोलीस अधिकाऱ्याकडून तसेच चौकशी यंत्रणाकडूनही करण्यात आलेल्या बेजबाबदारपणाचा एक एक प्रकार आता उघड होऊ लागला आहे.  गोवा विद्यापीठाच्या विशाखा  समितीकडून या प्रकरणात सबंधित पोलीसअधिकाऱ्याला  चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी  अनेकवेळा समन्स बजावले. परंतु एकदाही तो चौकशीला उपस्थित राहिला नाही. अनुपस्थितीसाठी कारणे देत राहिला अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांकडून देण्यात आली. समिती समन्स बजावत राहिली आणि अधिकारी अनुपस्थितीसाठी कारणे देत राहिला आणि बिचाऱ्या पीडीत विद्यार्थिनी न्यायाच्या प्रतीक्षेतच राहिल्या.  

एखादा  संशयित चौकशीसाठी सहकार्य करीत नसेल तर तसा अहवाल समितीने एक्सपार्टी निवाडा का सुनावला नाही. तसेच चौकशीस सहकार्य न करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई का सुरू करण्यात आली नाही हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत. समितीकडूनही बेजबाबदारपणा झाल्याचे हे स्पष्ट पुरावे आहेत.

‘१३ सप्टेंबरपर्यंत अहवाल द्या’    हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता महिला आयोगाने या प्रकरणात गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील चौकशी अहवाल १३ सप्टेंबरपर्यंत आयोगाने मागविला  आहे.  चौकशीच केली नाही तर अहवाल कसा देणार हा प्रश्न विद्यापीठाला पडला असेल तर लगबगीने चौकशी करून अहवाल पाठवावा लागणार आहे.

टॅग्स :goaगोवाWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी