शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रंगली नोकऱ्यांची 'रंगपंचमी'!; कर्मचारी निवड आयोगाकडून १,११७ उमेदवारांची निवड जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:05 IST

नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावर पार पडल्याने कर्मचारी भरती आयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: कर्मचारी निवड आयोगाने 'गुणवत्तेचा गुलाल' उधळत पारदर्शकतेचा आणखी एक अध्याय रचताना विविध सरकारी पदांसाठी १,११७ उमेदवारांची निवड जाहीर केली आहे. राज्यातील तरुणांच्या आयुष्यात 'यशस्वी' रंगांची उधळण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावर पार पडल्याने कर्मचारी भरती आयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आयोगाने कनिष्ठ लिपिक, शिपाई, शिक्षक, अकाउंटंट, पंचायत सचिव, लेखापाल, लॅबोरेटरी असिस्टंट इ 'क' श्रेणीतील पदांसाठी घेतलेल्या परीक्षेत गुणवत्तेनुसार केवळ पात्र आणि हुशार उमेदवारांनाच संधी दिली. 'ज्यांनी मेहनत केली, त्यांनाच फळ मिळाले' अशी भावना निवड झालेल्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळत आहे. अधिकृत माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवारांपैकी ६०३ जण उत्तर गोव्यातील असून हे प्रमाण ५४ टक्के तर ५१४ जण दक्षिण गोव्यातील असून हे प्रमाण ४६ टक्के आहे.

सामान्य कुटुंबांतील मुलांना दिलासा

पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असलेल्या या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुलांनाही सरकारी सेवेत जाण्याची संधी मिळाली आहे. कर्मचारी भरती आयोगाच्या या शिस्तबद्ध आणि पारदर्शक कारभारामुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास वाढला आहे. यापूर्वी सरकारी नोकऱ्यांमधील निवडीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, कर्मचारी भरती आयोग आल्यापासून हे प्रश्नचिन्ह दूर झाले आहे.

अशी आहे उमेदवारांची निवड

मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात ५४, फोंड्यात ६८, प्रियोळमध्ये ६०, मडकईत ५१, पर्वरीत ५०, काणकोणात ४८, मांद्रे ४७, पेंडणे ४३, डिचोली २८, थिवी ३१, म्हापसा २७, शिवोली २४, साळगांव १९, कळंगुट ०५, पणजी १९, ताळगांव २९, सांताक्रुझ २४, सांत आंद्रे १९, कुंभारजुवें ३०, मयें २२, पर्ये ३४, शिरोडा ३८, मुरगांव ७, वास्को ३१, दाबोळी १०, कुठ्ठाळी ६, नुवें ९, कुडतरी ७, फातोर्डा १०, मडगांव २७, नावेली १२, कुंकळ्ळी २८, वेळ्ळी ७, कुडचडें ३६, सावर्डे ३७, सांगे ३५ व काणकोण ४८ अशी उमेदवारांची निवड झालेली आहे. बाणावली मतदारसंघातून सर्वात कमी म्हणजे केवळ ३ उमेदवारांची निवड झाली आहे.

मेरिटवर अंतिम निवड

राज्य कर्मचारी निवड आयोगातर्फे गुणवत्तेवर निवड होत असली तरी काही आमदार मात्र त्यांचा वशिला चालत नसल्याने नाराज आहेत. आयोगामुळे आमदारांचे महत्त्व कमी झालेले आहे. ते नोकऱ्या देऊ शकत नाहीत, हे लोकांनाही कळून चुकले आहे. लोकांना नोकरभरती आयोगामार्फतच झालेली हवी आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या विश्वासार्हतेवर हे शिक्कामोर्तब असल्याचे मानले जाते.

फोंडा मतदारसंघ शैक्षणिकदृष्ट्या प्रगत मानला जातो, त्याचा फायदा उमेदवारांना झाला असावा, असे मानले जाते. प्रियोळ आणि साखळी या भागांतून मोठ्या प्रमाणात तरुणांनी तांत्रिक आणि शैक्षणिक पदांसाठी अर्ज केले होते. - मडकई आणि पर्वरीतील उमेदवारांचा कल 'क' श्रेणीतील प्रशासकीय नोकऱ्यांकडे अधिक होता. पंचायत सचिव, लेखापाल या पदांसाठी मोठी स्पर्धा होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Staff Selection Commission Announces 1,117 Job Selections Based on Merit

Web Summary : Goa's Staff Selection Commission announced 1,117 selections for government jobs, emphasizing transparency and merit. Rural candidates benefited from the fair process, boosting public trust. The selections, spread across various constituencies, highlight the commission's credibility, despite some political discontent.
टॅग्स :goaगोवाjobनोकरीState Governmentराज्य सरकार