शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

GOA SIR: राज्यातील ९० हजार मतदारांची नावे वगळणार; ९ डिसेंबरला मतदारयादी जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:51 IST

GOA SIR: गोवा राज्यात एसआयआरचे काम आता पूर्णत्वाच्या जवळ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात सध्या सुरू असलेल्या विशेष एसआयआर प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा डप्लिकेट आढळून आलेल्या जवळपास ९०,००० मतदारांची नावे वगळण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सीईओ संजय गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही मसुदा मतदार यादी ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

राज्यात एसआयआरचे काम आता पूर्णत्वाच्या जवळ आहे. मतदारांना वाटलेले ९६.५ टक्के अर्ज आधीच डिजिटायझेशन केलेले आहेत. राज्यातील ११.८५ लाख नोंदणीकृत मतदारांपैकी १०.५५ लाख अर्ज जमा झाले आहेत. तर फक्त ४०,००० अर्ज अद्याप जमा झालेले नाहीत. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ४ डिसेंबर आहे. छाननी केल्यानंतर मतदार यादी ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यावर दावे आणि हरकर्तीसाठी ९ डिसेंबर ते ८ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत असेल, असेही गोयल यांनी सांगितले.

याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी सांगितले की, सुमारे २.२० लाख मतदारांच्या नोंदी २००२ च्या एसआयआर नोंदींशी जुळत नाहीत, याचे मुख्य कारण त्यांच्या पालकांची नावे पूर्वीच्या यादीत नसणे आहे. या मतदारांची नावे अजूनही मसुदा मतदार यादीत समाविष्ट केली जातील, परंतु त्यांना भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये २००२ च्या एसआयआरमधील पालकांची माहिती किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने विहित केलेल्या इतर कागदपत्रांचा समावेश असेल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली.

ते म्हणाले की, आमच्याकडे ८८ ओसीआय कार्डधारक नोंदणीकृत आहेत, ते भारताचे नागरिक आहेत आणि म्हणूनच मतदारांना पात्र आहेत, ज्यांनी पोर्तुगीज पासपोर्ट निवडला आहे, तो भारतीय नागरिक असल्याचे समजतो आणि म्हणून मतदान करण्यास पात्र नाही, असेही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa: 90,000 Voters' Names to be Removed; Voter List on December 9

Web Summary : Goa's election body will remove about 90,000 names from voter lists due to absence, migration, or duplication. The draft list publishes December 9. Some 2.2 lakh voters must prove citizenship. OCI cardholders remain eligible; Portuguese passport holders are ineligible.
टॅग्स :goaगोवाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Votingमतदान