शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

म्हादईप्रश्नी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे कर्नाटकला मिळाला दिलासा तर गोव्याला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 17:37 IST

म्हादईचे 33.395 टीएमसी पाणी गोव्याला व 1.33 टीएमसी पाणी महाराष्ट्राला दिले गेले आहे. मध्यंतरी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकला एक पत्र दिले.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी म्हादई पाणी तंटा लवादाने जो निवाडा ऑगस्ट 2014 मध्ये दिला होता, तो अधिसूचित करावा ही कर्नाटक सरकारची विनंती गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. यामुळे कर्नाटकला दिलासा मिळाला तर गोव्याला हा धक्का ठरला आहे.म्हादई पाणी तंटा लवादाचा दि. 14 ऑगस्ट 2014 चा निवाडा कर्नाटकला व गोवा सरकारलाही मान्य नाही. त्या निवाड्याद्वारे कर्नाटकला म्हादईचे 5.40 टीएमसी पाणी दिले गेले आहे. निवाड्याला अगोदर कर्नाटकने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. प्रारंभी पर्रिकर सरकारने निवाड्याचे स्वागत केले होते पण कर्नाटकविरुद्धची एक रणनीती म्हणून लवादाच्या निवाड्याला गोवा सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

गोवा सरकारच्या याचिकेवर येत्या 15 जुलै रोजी सुनावणी घेण्याचं सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे पण लवादाचा निवाडा अधिसूचित करण्याचा मार्ग न्यायालयाने मोकळा केला आहे. यामुळेच कर्नाटकने म्हादई पाणीप्रश्नी बाजी मारली असा अर्थ होतो. गोव्यातील विरोधी पक्षांनी याबाबत गोवा सरकारला दोष देणे सुरू केले आहे. मात्र न्यायालयाचा अंतिम निवाडा हा गोव्याला म्हादईप्रश्नी न्याय देणारा ठरेल असा आम्हाला अजून पूर्ण विश्वास असल्याचे जलसंसाधन खात्याचे मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांचे म्हणणे आहे.

गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकने ज्या याचिका सादर केल्या आहेत, सर्वोच्च न्यायालयात 15 जुलै रोजी सुनावणी होईलच पण लवादाचा निवाडा अधिसूचित झाल्यानंतर कर्नाटककडून म्हादईचे पाणी वळविण्याचे काम आणखी वेगात केले जाईल. यामुळे गोव्यातील जनजीवनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. लवादाचा निवाडा अधिसूचित होताच कर्नाटक सरकार म्हादईचे पाणी वळवून कळसा भंडुरा प्रकल्पाची अंमलबजावणी करील.

म्हादईचे 33.395 टीएमसी पाणी गोव्याला व 1.33 टीएमसी पाणी महाराष्ट्राला दिले गेले आहे. मध्यंतरी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकला एक पत्र दिले. एकदा लवादाचा निवाडा राजपत्रत अधिसूचित झाल्यानंतर कर्नाटक सरकार वनविषयक परवाने मिळवून कळसा भंडुरा प्रकल्पाची अंमलबजावणी करू शकते, असे जावडेकर यांनी त्या पत्रत म्हटले आहे. 24 डिसेंबर 2019 रोजी ते पत्र दिले गेले व त्यावरून गोव्यात मोठा वाद निर्माण झाला होता. कर्नाटकच्या इच्छेनुसार यापुढे लवादाचा निवाडा अधिसूचित होताच कर्नाटककडून हुबळी-धारवाड व बेळगावच्या काही भागांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी म्हादई नदीचे पाणी वळविले जाणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकच्या वकिलांचे म्हणणो गुरुवारी ऐकून घेतले व पुढील सुनावणीसाठी जुलै महिना निश्चित केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लगेच एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी गोवा सरकारची आव्हान याचिका 15 जुलै रोजी सुनावणीस घेण्यास न्यायालय तयार झाले एवढेच म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाKarnatakकर्नाटकriverनदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय