शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गोवा शिपयार्डने परदेशातसुद्धा व्यवसाय वाढवण्याकरिता पुढाकार घ्यावा - निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 5:03 PM

गोवा शिपयार्डकडून बांधण्यात येणाऱ्या जहाजांचा दर्जा उत्कृष्ठ असल्याची जाणीव अनेक विदेशी देशांना सुद्धा असून, यामुळेच यापूर्वी श्रीलंका, मॉरिशस सारख्या राष्ट्रांनी आपल्या सशस्त्र दलासाठी त्यांच्याकडून जहाजे घेतलेली आहेत.

ठळक मुद्देगोवा शिपयार्डकडून बांधण्यात येणाऱ्या जहाजांचा दर्जा उत्कृष्ठ असल्याची जाणीव अनेक विदेशी देशांना सुद्धा असून, यामुळेच यापूर्वी श्रीलंका, मॉरिशससारख्या राष्ट्रांनी आपल्या सशस्त्र दलासाठी त्यांच्याकडून जहाजे घेतलेली आहेत.भारतीय तटरक्षक दलासाठी पाच अत्याधुनिक जहाजे बांधण्याचा प्रकल्प गोवा शिपयार्डला देण्यात आलेला असून, यापैंकी पहिल्या जहाजाच्या जलावतरण समारंभाला गुरुवारी (दि.२१) संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या

वास्को - जहाज बांधणी क्षेत्रात गोवा शिपयार्ड ने प्रत्येक वेळी भरारीची कामगीरी केलेली असून यामुळेच भारतीय संरक्षण विभाग गोवा शिपयार्डला मोठ्या प्रमाणात वेळोवेळी जहाज बांधण्याचे प्रकल्प देतात. गोवा शिपयार्डकडून बांधण्यात येणाऱ्या जहाजांचा दर्जा उत्कृष्ठ असल्याची जाणीव अनेक विदेशी देशांना सुद्धा असून, यामुळेच यापूर्वी श्रीलंका, मॉरिशस सारख्या राष्ट्रांनी आपल्या सशस्त्र दलासाठी त्यांच्याकडून जहाजे घेतलेली आहेत. गोवा शिपयार्डने याचाच फायदा उठवित त्यांचा व्यपार विदेशात सुद्धा पसरवण्यासाठी येणा-या काळात पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री श्रीमती. निर्मला सीतारामन यांनी केले.भारतीय तटरक्षक दलासाठी पाच अत्याधुनिक जहाजे बांधण्याचा प्रकल्प गोवा शिपयार्डला देण्यात आलेला असून, यापैंकी पहिल्या जहाजाच्या जलावतरण समारंभाला गुरुवारी (दि.२१) संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबर राज्य आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख संचालक राजेंद्र सिंग, अतिरिक्त संचालक के. नटराजन, गोवा शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक बी.बी. नागपाल, तटरक्षक दलाचे निरीक्षक प्रमुख मनोज बाडकर, गोवा तटरक्षक दलाच्या विभागाचे प्रमुख फिलीपोनीस पायनमुट्टल व इतर मान्यवर उपस्थित होते. जलावतरण समारंभाच्या वेळी ह्या जहाजाचे नामस्करण करण्यात आले असून या जहाजाचे नाव ‘आयसीजी सचेत’ असणार असल्याचे संरक्षणमंत्री सीतारामन यांनी यावेळी घोषीत केले. याप्रसंगी बोलताना सीतारामन यांनी आजचा दिवस एतिहासिक दिवस असल्याचे सांगून लढाऊ जहाज बांधणीच्या क्षेत्रात गोवा शिपयार्ड खरोखरच उत्तम कामगीरी करत असल्याचे सांगितले. यापूर्वी गोवा शिपयार्डला तटरक्षक दलाकरीता पाच जहाजे बांधण्याचा प्रकल्प देण्यात आल्यानंतर हे काम उत्कृष्ठ व अत्याधुनिक पद्धतीने वेळेवर पूर्ण करून दिल्याने त्यांना पुन्हा आणखीन पाच जहाजे बांधण्याचे काम देण्यात आल्याची माहीती सीतारामन यांनी दिली. ह्या प्रकल्पातील आज पहील्या जहाजाचे जलावतरण होत असून गोवा शिपयार्ड यावेळी सुद्धा प्रत्येक वेळासारखीच भविष्यातही अभूतपूर्व कामगीरी करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोवा शिपयार्डकडून करण्यात येत असलेल्या अभूतपूर्व अशा कामाची जाणीव भारतीय संरक्षण विभागाला असल्यानेच त्यांना पुन्हा पुन्हा विविध जहाज बांधणीचे प्रकल्प देण्यात येत असून याकारणामुळेच त्यांना भविष्यात नौदलासाठी दोन अत्याधुनिक ‘मिसाईल्स फ्रीग्रेट’ जहाज बांधण्याचाही प्रकल्प देण्यात आलेले असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.२०१४ सालापासून अजून तटरक्षक दलाच्या ताफ्यात ६४ जहाजे आलेली असून यापैंकी ७५ टक्के जहाजे गोवा शिपयार्डने बांधलेली असून यावरूनच संरक्षण दलाचा गोवा शिपयार्डवर असलेला पूर्ण विश्वास दिसून येतो. भारताबरोबरच गोवा शिपयार्डकडून बांधण्यात येणाºया उत्कृष्ठ जहाजाबाबत विदेशी देशांना सुद्धा जाणीव असल्याने काही विदेशी देशांने सुद्धा गोवा शिपयार्डकडून जहाजे बांधून घेतलेली असून यात २ श्रीलंका नौदलातील ‘ओफ शोर पेट्रोल’ जहाजांचा समावेश असून मोरेशीयस तटरक्षक दलात १३ जहाजांचा समावेश असल्याची माहीती सीतारामन यांनी दिली. गोवा शिपयार्डकडून जहाजबांधणीत करण्यात येणा-या उत्कृष्ट कामगीरीची प्रशंसा विदेशात सुद्धा होत असून याचा फायदा त्यांनी उठवण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. भारतातील संरक्षण विभागांना जहाज बांधून देण्यापूर्तेच मर्यादीत न राहता गोवा शिपयार्डने विदेशी बाजारात सुद्धा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मोठा पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भारतातील खासगी व सार्वजनिक व्यवस्थापनांनी आपला व्यवसाय विदेशात सुद्धा वाढवावा असे स्वप्न असून गोवा शिपयार्ड यात नक्कीच यशस्वी होऊन जहाज बांधणी क्षेत्रात विदेशातही आपले नाव उंचवणार असा विश्वास त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला. याप्रसंगी भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख संचालक राजेंद्र सिंग यांनी गोवा शिपयार्ड कडून जहाज बांधणीच्या क्षेत्रात करण्यात येत असलेल्या उत्कृष्ठ कामगिरीची प्रशंसा केली. मागील काही वर्षात तटरक्षक दलाचे बळ वाढवण्यासाठी संरक्षण विभागाने भरारीचा पुढाकार घेतलेला असून सध्या तटरक्षक दलाच्या ताफ्यात १३८ जहाजे व ६२ एअरक्राफ्ट असल्याची माहीती त्यांनी दिली. तटरक्षक दलाने देशाची सुरक्षा सांभाळण्यासाठी काम करण्याबरोबरच मागील काही वर्षात एकून ९५०० जणांचे समुद्रात प्राण बचाविलेले असल्याचे माहीतीत शेवटी बोलताना सांगितले. गोवा शिपयार्डचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक बी बी नागपाल यांनी आपल्या स्वागतपर भाषणात आमच्या कामगार व अधिका-यांच्याच अथक प्रयत्नामुळे आम्ही विकास केलेले असल्याचे सांगून जहाज बांधणी क्षेत्रात आणखीन विकास करण्यासाठी गोवा शिपयार्ड सतत अचुक पावले उचलणार असे ते शेवटी बोलताना म्हणाले. आयसीजी सचेत ह्या जहाजाचे गुरवारी जलावतरतण झाल्यानंतर ह्या जहाजाचे राहीलेले काम सुमारे ८ महीन्यानंतर पूर्ण करून अनावरण केल्यानंतर जहाज देशसेवेत रूजू होणार आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनgoaगोवा