शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

गोवा सुरक्षा मंचचे दरवाजे शिवसेनेबरोबर युतीसाठी अद्याप खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 20:39 IST

गोवा सुरक्षा मंच लोकसभेसाठी दोन्ही उमेदवार येत्या रविवारी ३१ रोजी जाहीर करणार आहे.

पणजी : गोवा सुरक्षा मंच लोकसभेसाठी दोन्ही उमेदवार येत्या रविवारी ३१ रोजी जाहीर करणार आहे. लोकसभा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडे युतीचे दरवाजे या पक्षाने अजून खुले ठेवले आहेत. पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर म्हणाले की, ‘सेनेकडे युतीचा पर्याय खुला असला तरी मांद्रेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.१0 एप्रिलपर्यंत मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होईल. त्यानंतर आठ दिवसात दुसरी फेरी पूर्ण होईल. पणजी मतदारसंघासाठी अजून तारीख जाहीर झाली नसली तरी आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पर्रीकरांच्या तोडीचा उमेदवार आम्ही देणार आहोत. म्हापशात बूथस्तरीय बैठका पूर्ण झालेल्या आहेत. तेथेही १0 एप्रिलपर्यंत प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली जाईल. लोकसभेसाठी उत्तरेत आणि दक्षिणेत प्रत्येकी एकेक नाव निश्चित झालेले आहे आणि ३१ रोजी या नावांची घोषणा केली जाईल.’ 

 ‘मध्यावधी निवडणुका अटळ’

गोव्यात सध्या राजकीय स्तरावर जे काही चालले आहे ते पाहता विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका अटळ असल्याचे भाकित वेलिंगकर यांनी केले. ते म्हणाले की, केवळ ४ विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर कमीत कमी २५ मतदारंसंघांमध्ये उमेदवार देण्याची तयारी गोसुमंने केली आहे. या मतदारसंघांमध्येही पक्षाचे काम जोमाने सुरु आहे.

 अस्थिकलश कार्यक्रम ‘फ्लॉप शो’ - वेलिंगकर यांची टीका 

 भाजपवर आरोप करताना वेलिंगकर म्हणाले की, ‘दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा अस्थिकलश गावोगावी फिरविण्याचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने ‘फ्लॉप शो’ ठरला आहे. पर्रीकरांच्या राजकारणातील प्रतिमेचे भांडवल करण्यासाठी तसेच सहानुभूतीचा फायदा उठविण्यासाठीच अस्थिकलश फिरवण्यात आले. परंतु लोकांनी भाजपला भांडवल करू दिले नाही. लोकहिताच्या अनेक विषयांवर भाजप अपयशी ठरल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला. ते म्हणाले की, ‘ बेरोजगारी, म्हादई, सीआरझेड, प्रादेशिक आराखडा, खाणबंदी या प्रश्नांवर भाजपने लोकांची फसवणूक केली.