शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा सुरक्षा मंचाचा पर्रिकरांना टोला, 'अतिशहाणा त्याचा बैल रिकामा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 21:17 IST

गैरप्रकाराने नूतनीत करण्यात आलेली खाण लिजांचे नूतनीकरण रद्द ठरवून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या तोंडावर थप्पड मारली आहे.

पणजी:  गैरप्रकाराने नूतनीत करण्यात आलेली खाण लिजांचे नूतनीकरण रद्द ठरवून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या तोंडावर थप्पड मारली आहे. ‘अतिशहाणा त्याचा बैल रिकामा’याची प्रचिती मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना दिल्याचे गोवा  सुरक्षा मंचाचे निमंत्रक आनंद शिरोडकर यांनी म्हटले आहे. न्यायालयाचे निर्देश स्पष्ट असतानाही प्रत्येक बाबतीत आपली विद्वत्ता दाखविण्याचा मुख्यमंत्र्याचा दुराग्रह हा गोव्याच्या हिताला बाधा ठरत आहे. खाण लिजांचा लिलाव करण्याचा निर्णय केंद्र घेते आणि तसा वटहुकूम जारी होण्याच्या अवघ्या एक दोन दिवस अगोदर गोव्यात खाण लिजे वाटली जातात. खाण माफिया गोव्यात शिरतील म्हणून लिलाव करण्यात आला नाही असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी पत्रकारांना सांगितले होते. खाण माफियांचे भय घालून मुख्यमंत्री कुणाचे हीत साधू पाहत आहेत याची पूर्ण माहिती गोव्यातील लोकांना आहे. तसेच न्यायसंस्थाही जागृत आहे. ३५०० हजार कोटी रुपयांच्या लुटीच्या वसुलीसाठीही न्यायालयाने सरकारचे कान पिळले आहेत. राज्य सरकारने १ रुपयाचीही वसुली केलेली नाही आणि खाण उद्योग सुरू करण्यासही अपयशी ठरले असल्याचे शिरोडकर यांनी म्हटले आहे. म्हादईसह सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी त्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आली आहे. ढेपाळलेला खाण उद्योग पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि राज्य सरकारही त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे महसुलासाठी खाण उद्योगावर अवंबून न राहता नवीन पर्याय पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा