शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Goa: त्या रेंट ए कारचा परवाना रद्द करणार, एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस - वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 15:24 IST

Goa: गुरुवारी मांडवी पुलावर झालेल्या अपघातास रेंट कारचा पर्यटक चालक पूर्णपणे जबाबदार असून त्या रेंट ए कारचा परवाना रद्द केला जाणार तसेच जबाबदार रेंट ए कार एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण घेतले जाणार, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांना सांगितले.

- नारायण गावसपणजी - गुरुवारी मांडवी पुलावर झालेल्या अपघातास रेंट कारचा पर्यटक चालक पूर्णपणे जबाबदार असून त्या रेंट ए कारचा परवाना रद्द केला जाणार तसेच जबाबदार रेंट ए कार एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण घेतले जाणार, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांना सांगितले. आम्ही त्या पर्यटक चालकाचा त्यांच्या राज्यातही वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची मागणी करणार आहोत. तसेच यापुढे रेंट ए कार एजन्सीसाठी कडक नियम लागू केले जाणार, असे मंत्री म्हणाले.

गेल्या महिन्याभरात राज्यात रेंट ए कार पर्यटक चालकांकडून अपघात वाढले असून यात निष्पाप लाेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे रेंट ए कार देताना एजन्सीने पर्यटकांची पूर्ण तपासणी करावी. त्यांना राज्यातील रस्त्यांचे योग्य मार्गदर्शन करावे. रेंट ए कार देताना त्या चालकाचा परवाना तसेच जर ताे दारुडा तसेच इतर काही त्रुटी असल्यास वाहने त्यांना देऊ नये. यापुढे रेंट ए कारवाल्यासाठी कडक नियमावली लागू केली जाणार आहे. जर नियमांचे पालन केले जात नसेल तर परवाना रद्द केला जाणार असल्याचा इशारा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला आहे.

मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, पर्यटक वाढत असल्याने रेंट ए कार परवान्यासाठी वाहतूक खात्याकडे अनेक अर्ज येत आहेत. पण आम्ही गेल्या तीन वर्षांपासून रेंट ए कारचा परवाना बंद केला आहे. तसेच ज्या रेंट ए कार आहेत. त्यांना पाच वर्षानंतर परवाना नुतनीकरण करावा लागतो. त्यावेळी त्यांची पूर्ण तपासणी केली जाते. रेंट ए कारवाल्यांकडे स्वताची पार्किंग जागाही नसते त्यामुळे आपल्याला हवी तिथे कार लावतात. तसेच पर्यटकांकडे गाडी देताना त्याची याेग्य तपासणी करत नसल्याचे समोर आले आहे. या एकूण सर्व प्रकाराची तपासणी हाेणार आहे.

वाहतूक खात्यातर्फे नुकतीच जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या सदस्यांसोबत बैठक झाली आहे. यावेळी राज्यात १२ अपघात प्रवणक्षेत्र शोधले असून त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला तसे आदेशही दिले आहेत. वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करावे. वेगाने गाडी चालवू नये. दारु पिऊन गाडी चालवू नये, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार