शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

घरात काम करणाऱ्या महिलेला ठेवलं कोंडून, सरकारी अभियोक्ताला ठोठावला 60 हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 20:02 IST

घरात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला कपाटात बंद करुन तिच्या जीवाला धोका पोहोचविल्याबद्दल गोव्यातील सरकारी अभियोक्ता लादिस्लाव फर्नांडिस यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

मडगाव- घरात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला कपाटात बंद करुन तिच्या जीवाला धोका पोहोचविल्याबद्दल गोव्यातील सरकारी अभियोक्ता लादिस्लाव फर्नांडिस यांना दोषी ठरवण्यात आले आहे. शिवाय, मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाने न्यायालय उठेपर्यंत शिक्षा आणि 60 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम पीडित महिलेला देण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. बुधवारी (30 जानेवारी)ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

दंड न भरल्यास संशयिताला तीन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संशयिताने या शिक्षेविरुद्ध  सत्र न्यायालयात जाण्याचे अपील केल्यानंतर या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली. सत्र न्यायालयात जाण्यासाठी संशयिताला एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मडगावचे प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीक्ष राम प्रभुदेसाई यांनी हा निवाडा दिला.  28 जानेवारीला या खटल्याचा निवाडा होणार आहे. मात्र निवाडा तयार झालेला नसल्याने खटला पुढे ढकलण्यात आला होता.

मागच्या आठवडयात न्यायालयात शिक्षेवर शिक्षेवर अंतिम युक्तीवाद झाले. सरकारी वकील प्रीतम मोराईस यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा ठोठावी अशी मागणी केली होती. तर आरोपीच्यावतीने वकील ए. रिबेलो यांनी अंतिम युक्तीवाद करताना आपल्या अशिलाला सौम्य शिक्षा ठोठावी अशी मागणी केली होती. आपल्या अशिलाला सरकारी नोकरीतून  निवृत्त होण्यास अवघे दीड वर्षे शिल्लक आहे. सरकारी नोकरीच्या कारकर्दीत त्यांना आतापर्यंत एकही मेमो आलेला नाही.

तो घरातील एकमेव कमवता आहे. तसेच त्याची दोन मुले त्यांच्यावर अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना सौम्य शिक्षा ठोठवावी अशी मागणी केली. मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राम प्रभूदेसाई यांच्यासमोर 21 जानेवारीला हा अंतिम युक्तीवाद झाला. त्यापूर्वी  14 जानेवारी रोजी शिक्षेवर अंतिम युक्तीवाद करण्यासाठी संशयिताच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्याने ही सुनावणी 21 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली होती.

घरात काम करणाऱ्या महिलेला कपाटात बंद करुन तिच्या जीवाला धोका पोहोचविल्या प्रकरणात फर्नांडिस याला भादंसंच्या 323 (दुखापत करणे), 341 (बळजबरीने अडवणूक करणे) आणि 346 (बंद जागेत कोंडून दुखापत करणे) या कलमाखाली दोषी ठरविण्यात आले आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, फर्नांडिस यांनी आपल्या घरी एका अल्पवयीन मुलीला घरातील कामे करण्यासाठी ठेवले असल्याची तक्रार एका एनजीओकडून करण्यात आल्यावर पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी करण्यासाठी प्रयत्न केला असता संशयिताने त्या मोलकरणीला लोखंडी कपाटात घालून त्या कपाटाला चावी ठोकली होती. नंतर पोलिसांनी हे कपाट उघडायला लावून त्या मुलीची सुटका केली होती. दरम्यानच्या काळात सदर मुलगी अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाल अत्याचाराच्या गुन्ह्यातून फर्नांडिस याला मुक्त करण्यात आले होते. मात्र इतर गुन्ह्याखाली त्याच्यावर सुनावणी चालू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी