शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मद्यपींचं बुरे दिन; कायमस्वरुपी गुन्हेगारांच्या यादीत नाव जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 21:48 IST

दारुच्या नशेत वाहने चालविणाऱ्यांनी सवय मोडली नाही, तर काय होऊ शकते याची कल्पना बहुतेकांना नाही.

पणजी: दारुच्या नशेत वाहने चालविणाऱ्यांनी सवय मोडली नाही, तर काय होऊ शकते याची कल्पना बहुतेकांना नाही. अशा चालकांना केवळ दंड ठोठावून व चालक परवाने निलंबित करून पोलीस थांबणार नाहीत, तर अशा व्यक्तीला कायमचेच गुन्हेगारांच्या यादीत टाकले जाणार आहे. त्यामुळे भविष्याच चारित्र्याचा दाखला मिळणार नाही व कधी पासपोर्टही बनविता येणार नाही. पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्याशी झालेल्या गप्पादरम्यान त्यांनी मद्यपी चालकांवर येत्या काळात केल्या जाणाऱ्या कारवाईची माहिती दिली.वाहतूक नियम मोडणाऱ्यांना पासपोर्ट मिळणार नाही हे कसे काय असे मुक्तेश चंदर यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, पासपोर्ट पोलीस खात्याकडून दिला जात नाही. त्यामुळे हे विधान मी थेट करू शकत नाही, परंतु अर्थ मात्र तसाच होत आहे. वाहतूक नियमभंगाचे खूप प्रकार आहेत. सर्वात मोठा गुन्हा तेव्हाच ठरतो, जेव्हा वाहन चालक शुद्धीत नसताना किंवा अर्ध्या शुद्धीत असताना वाहन चालवितो. कारण अशी माणसे कुणाला कधी कशी धडक देऊन मारून टाकतील काही सांगता येत नाही. त्यामुळे पोलीस अशा लोकांच्या बाबतीत कठोर वागतील. कायद्यानुसार त्याला  शिक्षाही होईल. त्याची नोंदही ठेवली जाणार आहे. भविष्यात हा माणूस एखादा महत्त्वपूर्ण दाखला वगैरे मागायला अला त्यावेळी त्याला त्रास होईल. पासपोर्टसंबंधीच्या अर्जावरच कधी दोषी सिद्ध होवून न्यायालयात गेलाय काय असा प्रश्न असतो. त्यावर ही अशी माणसे काय लिहिणार? शिवाय अशा माणसाच्या बाबतीत पासपोर्टसाठी पोलीस अहवाल मागितला जाईल. त्यातही त्याच्या तुरुंगवासाचा उल्लेख असणार. म्हणजे त्याला पासपोर्ट कसा मिळणार?’ असा प्रश्न त्यांनी केला.  अजूनही मोठ्या प्रमाणावर नशेत वाहने चालविण्याचे प्रकार घडत असल्याचे ते सांगतात. पहिल्याच मोहिमेत पोलिसांना ३१५ जण मद्यपी चालक सापडले. ही मोहीम दोन दिवसांपूर्वी जाहीर करून सुरू केली होती. त्यानंतर जाहीर न करता अचानक रात्रीच्यावेळी हाती घेतलेल्या मोहिमेतही मोठ्या प्रमाणावर तसे चालक मिळाले. यापुढे आकस्मिकपणे मोहिमा हाती घेतल्या जातील. मद्यपी चालकांच्या विरोधात वारंवार कारवाई केली जाईल आणि ती ही आकस्मिकपणे, अशी माहिती त्यांनी दिली. पोलीस कारवाईत ढिसाळपणा आहे असे म्हणता येणार नाही. मद्यपी चालकांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल. स्वत: पोलिसांनी तर या बाबतीत खूप सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले. नशेत असताना ड्रायव्हिंगवर लक्ष लागत नाही. उलट शुद्ध हरपल्यामुळे चालक अनेक चुका करून बसतो. त्यामुळे केव्हाही पोलीस आल्कोमिटर घेऊन रस्त्यावर राहू शकतात असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसpassportपासपोर्ट