शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची धडक टाळण्याच्या प्रयत्नात पोलीस शिपाई थेट ४५ फूट खोल विहिरीत पडला; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 18:02 IST

समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक चुकवताना शिपाई विहिरीत पडला

म्हापसा : ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय देणारी घटना म्हापसा येथे एका पोलीस शिपाईच्या बाबतीत घडली आहे. गोवा पोलिसात कार्यरत असलेला हा शिपाई ४५ फूट खोल विहिरीत पडला. पण दैव बलवत्तर म्हणून स्वप्नील सुखरूप वाचला.

प्राप्त माहितीनुसार, मुशीरवाडा-कोलवाळ येथे राष्ट्रीय महामार्गजवळील विहिरीत पडलेल्या पोलीस शिपाई स्वप्नील गांवस (२९, नावेली-साखळी) यांना म्हापसा अग्नीशमन दलाच्या जवानांनी साडेचार तासांनी सुखरूप बाहेर काढले. हा विचित्र अपघात रविवारी (दि.२६) पहाटे ५.३० च्या सुमारास घडला. जखमी स्वप्नील गांवस जुन्या गोवा पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. रात्रीची सेवा बजावून ते वझरी पेडणे येथे सासूरवाडीला जाताना हा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गावरून पेडणेच्या दिशेने जखमी गावस हे (जीए ०४ डी ६९३१) क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी वाटेत मुशीरवाडा येथे पुलाजवळ समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक त्यांच्या अंगावर आला असता या ट्रकपासून स्वत:चा बजाव करण्यासाठी गांवस यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली.

यावेळी त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी रस्त्याच्या बाजूच्या झाडा-झुडपात गेली. दुचाकीस्वार गांवस हे मोटारसायकल वरून उसळून नेमके जवळच्या विहिरीत पडले. तर दुचाकी झुडपात अडकून राहिली. महामार्गपासून चार पाच मीटरवर ही ४५ फूट खोल विहीर आहे. म्हापसा अग्नीशमन दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत, सुरज शेटगांवकर, सुरज कारापूरकर, गिरीश गावस व नितीन चोडणकर यांनी विहिरीत शिडी घालून तसेच जखमीला लाईफ जॅकेट व हेल्मेट देऊन त्यांना वरती काढले. त्यानंतर हा युवक पोलीस शिपाई असल्याचे स्पष्ट झाले. जखमी स्वप्नील गांवस याच्या उजव्या पायाला जखम झाली. त्यामुळे त्यांना जिल्हा इस्पितळातून पुढील उपचारार्थ गोमेकॉत पाठविले. सध्या तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचा पंचनामा पोलीस हवालदार भगवान शेटकर यांनी केला.

शिटीमुळे शिपायाचा जीव वाचला- या विहिरीत चार ते पाच फूट पाणी होते. पाण्यात पडल्याने गांवस याचा खिशातील मोबाईलही भिजला. त्यामुळे त्यांनी स्वत: जवळील शिटी वाजवून व मोठ-मोठ्याने आरडाओरडा करून मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. पण, लोकांना त्यांच्या शिटीचा आवाज ऐकू आला. परंतु हा आवाज नेमका कुठून येतो याची कल्पना येत नव्हती. - सकाळी नऊच्या सुमारास विहिरी शेजारील घरातील एक व्यक्ती दुचाकी धुवत होती. त्याला या शिटीचा आवाज आला. तसेच बाजूला झाडांमध्ये पडलेली दुचाकीही त्याच्या नजरेस पडली. त्या शिटीच्या आवाजाच्या दिशेने ती व्यक्ती गेली असता त्याला विहिरीत एक युवक असल्याचे आढळले. त्यानंतर त्याने लगेच अग्नीशमन दल व पोलिसांना पाचारण केले.