शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

गोवा मानवी तस्करीचे केंद्र नव्हे: पोलीस महासंचालक जसपाल सिंग

By समीर नाईक | Updated: May 10, 2024 17:48 IST

गोवा पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी युनिटकडून शुक्रवारी खास जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

समीर नाईक, पणजी: गोव्याला मानवी तस्करीचे प्रमुख केंद्र असे म्हणता येणार नाही, कारण येथे अशाप्रकारच्या घटना खुप कमी घडतात. गोवा पर्यटक स्थळ असल्याने बाहेरुन येथे येऊन वैश्या व्यावसाय चालवणे एकवेळ सोपे आहे, पण येथून इतर कुठल्या ठिकाणी मानवी तस्करी होणे शक्य नाही. आम्ही मानवी तस्करी होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करत असतो. प्रामुख्याने भाडेकरूंच्या तपासणी वेळी चार ते पाच मुली एकत्र राहताना आढळल्यास आम्ही थेट चौकशी करतो, अशी माहीती पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिली.

गोवापोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी युनिटकडून शुक्रवारी खास जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने पोलिस महासंचालक जसपाल सिंग बोलत होते. दरम्यान इतर पोलिस अधिकारी, बिगर सरकारी संस्था, समाज कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यात वैश्या व्यावसायबद्दल अनेक जाहीराती प्रसिध्द होतात. याची माहीती आम्हाला आहे. तसेच काम देण्याचे कारण देत अनेकांना या व्यावसायात आणले जाते, यावरही आमची नजर आहे. या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही तक्रारी इकोनोमी ऑफेंसिव्ह सेलकडे करत असतो. हे त्यांच्या अधिपत्याखाली येते. पण गोवा पोलिसही यावर लक्ष्य ठेऊन असते. या सर्व घडमोडी असतातच पण यातून मानव तस्करी गोव्यातून होत आहे, हे म्हणणे चूकीचे आहे, असे सिंग यांनी यावेळी सांगितले.

गोवा पोेलिस हॉटेल्स, पब्स व इतर ठिकाणी कोणी भेट दिली, किती वेळा थांबले या सर्व गोष्टींचा अहवाल रोज घेतो. या व्यतिरिक्त राज्यात भाड्याच्या खोलीत कोण राहत आहे, याचाही आढावा घेत असतात. इतर अनेक उपाययोजना सुरक्षतेच्याहेतू आणि मानव तस्करी होऊ नये यासाठी केल्या जातात. आम्ही ११२ हा हेल्पलाईन क्रमांकही लोकांसाठी जारी केला आहे, असेही सिंग यांनी पुढे सांगितले.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस