शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बाबु कवळेकर यांचा अटकपूर्व जामीन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 20:16 IST

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक होईल या भीतीने कवळेकर यांनी दक्षिण गोवा प्रधान सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

मडगाव: गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबु कवळेकर यांनी दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयीन कक्षेच्या तांत्रिक कारणावरुन आज रदद करण्यात आला. न्यायाधीश बी.पी.देशपांडे यांच्या न्यायालयात हा खटला चालू आहे. मात्र, कवळेकर याचा अंतरिम जामीन 8 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.न्यायालयाने यापूर्वी कवळेकर याला अंतिरम जामीन मंजूर केला होता. या खटल्यासंबधी न्यायालयीन कक्षेच्या कारणावरुन खास सरकारी वकील जे.डी.किर्तनी यांनी हा खटला दक्षिण गोव्याच्या न्यायालयात चालविण्याबाबत हरकत दर्शाविली होती. सरकार पक्षाने त्यासंबधीचा अर्जही न्यायालयात दाखल केला होता. कवळेकर यांच्याविरोधात पणजी येथे गुन्हा नोंद झाला. भ्रष्ट्राचार प्रतिबंधात्मक विभाग पणजीत आहे. कवळेकर हे ईडीसीचे अध्यक्ष होते हेही कार्यालय पणजीत आहे. सर्च वॉरन्टबददलही तपासयंत्रणेने तेथील न्यायालयात अर्ज केला होता. सबब हा खटल्याची सुनावणी उत्तर गोवा न्यायालयात व्हावी अशी मागणी खास सरकारी वकील जे.डी.किर्तनी यांनी मागच्या सुनावणीच्या वेळी केली होती. तर कवळेकर यांच्यावतीने वकील सुरेंद्र देसाई यांनी युक्तीवाद करताना कवळेकर यांचे वकील सुरेंद्र देसाई यांनी या प्रकणात ज्या मालमत्ता दाखविल्या आहेत. त्यातील बहुतांश या दक्षिण गोव्यात आहेत. आपले अशिलही याच जिल्हयात राहतात. त्यांनी अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचे वास्तव याच जिल्हयात आहे. कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांचीही मालमत्ता याच जिल्हयात आहे असे त्यांनी आपल्या युक्तीवादात म्हटले होते.बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक होईल या भीतीने कवळेकर यांनी दक्षिण गोवा प्रधान सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. बी.पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने कवळेकर यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.कवळेकर यांच्या विरोधात 2013 साली बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तत्कालीन भाजप सरकारने भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षानी म्हणजे 2017 साली या प्रकरणी एफआयआर नोंद करण्यात आला होता. याच प्रकरणात चौकशी करण्यासाठी कवळेकर यांना  शुक्रवार दि.9 फेब्रुवारी रोजी एसीबीच्या कार्यालयात हजर रहावे अशी नोटीस जारी केली होती. अंतिरिम जामीन मिळाल्यानंतर ते चौकशीसाठी एसीबीकडे हजरही राहिले होते. तपासयंत्रणोने त्यांची तब्बल तीन तास चौकशी केली होती. कवळेकर यांच्या बेतुल येथील निवासस्थानी, केपे येथील कार्यालयात तसेच मडगाव येथील त्यांच्या आस्थापनांच्या मुख्य कार्यालयात छापे टाकले होते. औदयोगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना 1 जानेवारी 2007 ते 30 एप्रिल 2013 या कालावधीत कवळेकर यांनी बेहिशोबी मालमत्ता केल्याचा आरोप आहे. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारgoaगोवा