शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोवा खाण घोटाळ्यातील इम्रानची दुबईत खाती,एसआयटीचे एनफोर्समेंटल खात्याला कारवाईसाठी पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 15:09 IST

खाण घोटाळयात अडकलेला ट्रेडर इम्रान खान याची दुबईतीतही बँक खाती असल्याचे उघडकीस आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने अंमलबजावणी खात्याला (इडी) पत्र लिहिले आहे.

वासुदेव पागी/ पणजी - खाण घोटाळयात अडकलेला ट्रेडर इम्रान खान याची दुबईतीतही बँक खाती असल्याचे उघडकीस आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने अंमलबजावणी खात्याला (इडी) पत्र लिहिले आहे. इम्रान खान हा मनी लॉंडरिंगमध्ये अडकला असल्यामुळे त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे त्यात म्हटले आहे. 

खाण ट्रेडर इम्रानच्या विरोधात चौफेर चौकशीचे जाळे फेकण्याच्या प्रयत्नात एसआयटी असून विविध एजन्सींना इम्रानच्या कारनाम्याचे माहिती देऊन कारवाईची सूचना एसआयटीकडून केली जात अहे. खाण खात्याबरोबरच अंमलबजावणी खात्यालाही एसआयटीने पत्र लिहून इम्रानचे व्यवहार कळविले आहेत. त्याचे दुबईत असलेल्या बँक खात्याची माहितीही देण्यात आली आहे. हा मनी लॉन्डरिंगचा प्रकार असून त्याची चौकशी केली जावी असे त्यात म्हटले आहे. 

मनी लॉन्डरिंग हा एसआयटीच्या अखत्यारीच्या बाहेरील विषय असून अंमलबजावणी विभागच या बाबतीत कारवाई करीत असतो. त्यामुळे तपासाचा हा भाग अंमलबजावणी विभागाकडे सोपविण्यात आल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांकडून देण्यात आली. एसआयटीकडून तशा आशयाचे पत्र मिळाल्याची माहिती अंमलबजावणी खात्याच्या सूत्रांकडून देण्यात आली. 

एसआयटीकडून मंगळवारी खाण खात्यालाही पत्र दिले होते. त्यात इम्रान खानवर खाण खात्याकडून जी कारवाई करायला हवी आहे त्या बद्दल लिहिले आहे. एमएमआरडी कायद्यानुसार एखाद्याला देण्यात आलेले खाण लीज हे लीजधारकाच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबियांच्या नावावर होण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. ती न करता त्या खाणीचा पावर आॅफ एटोर्नी कुणीही देऊ शकत नाही आणि घेऊ शकत नाही. परंतु इम्रान खानने ते केले आहे. इमिलिया फ्रिग्रेडो यांच्या खाण लिजाची बेकायदेशीरपणे पावर आॅफ एटॉर्नी घेऊन उत्खनन केल्यामुळे हे मंजूर झालेले खाण लीज काढून घेण्याची शिफारस केली आहे.

लीजच्या करारात तशी तरतूत असल्याचेही म्हटले आहे. वनखात्याचा व इतर आवश्यक परवाने न घेता आतापर्यंत बेकायदेशीरपणे उत्खनन करून इम्रानने कोट्यवदी रुपयांचा व्यवहार केला आहे. वसुलीचे अधिकारी हे एसआयटीला नाहीत, परंतु खाण खात्याला आहेत त्यामुळे हे पैसे वसूल करून घेण्यात यावे असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान अद्याप त्याबद्दल खात्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळाgoaगोवा