शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

'एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 15:09 IST

खाणींच्या बाबतीत वटहुकूम न काढता केंद्र सरकारने थेट एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्यावा, अशी मागणी गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देएमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्याबंद असलेल्या खाणी पूर्ववत् सुरु करण्याच्याबाबतीत वटहूकूम काढण्यास केंद्र सरकार अनुकूल नसल्याने त्याचे तीव्र पडसाद खाण अवलंबितांमध्ये उमटले खाणी पूर्ववत सुरू व्हाव्यात यासाठी केंद्राला राजी करणार की नाही याबाबत भाजपाच्या तिन्ही खासदारांनी स्पष्टीकरण द्यावे

पणजी : संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या महिन्यात होत आहे. त्यामुळे आता अगदीच कमी अवधी उरल्याने खाणींच्या बाबतीत वटहुकूम न काढता केंद्र सरकारने थेट एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्यावा, अशी मागणी गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी केली आहे. खाणींच्या बाबतीत गोव्यातील स्थिती अन्य राज्यांमधील खाणींच्या तुलनेत वेगळी आहे. येथे खाण व्यवसायाकरिता खाजगी जमिनी मालकी तत्त्वावर दिल्या गेलेल्या आहेत. लीज नव्हे, तर पोर्तुगीज कन्सेशनवर जमिनी दिलेल्या आहेत, असा दावाही ते करतात. 

बंद असलेल्या खाणी पूर्ववत् सुरु करण्याच्याबाबतीत वटहूकूम काढण्यास केंद्र सरकार अनुकूल नसल्याने त्याचे तीव्र पडसाद खाण अवलंबितांमध्ये उमटले आहेत. खाणी बंद झाल्याने बेकार झालेले कामगार, ट्रकवाले, बार्जवाले तसेच अन्य अवलंबितांचे प्रतिनिधीत्त्व करणारे पुती गावकर यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी वरील मागणी केली. 

खाणी पूर्ववत सुरू व्हाव्यात यासाठी केंद्राला राजी करणार की नाही याबाबत भाजपाच्या तिन्ही खासदारांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रश्नावर सभापती प्रमोद सावंत यांची भेट घेतली तसेच नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. 

गावकर म्हणाले की, ‘खाणबंदीमुळे  ३ लाख लोकांचा उदरनिर्वाह गेला आहे. कामगारांबरोबरच ट्रकमालक, बार्जमालकांना झळ पोचलीच. त्याचबरोबर खाणपट्टयातील गॅरेजवाले, चहाची हॉटेल्स, खानावळी यांनाही फटका बसला. एकूण अर्थव्यवस्थाच कोलमडली.खाणी कधी सुरु होणार हे निश्चित नाही. मुख्यमंत्री पर्रीकर अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतात परंतु आम्ही या व्यवसायातील घटक असूनही आम्हाला डावलले जाते, असा आरोप करुन सरकारला काय लपवायचे आहे?, असा सवाल त्यांनी केला. सरकारने खाण अवलंबितांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप त्यांनी केला. 

आमदार, मंत्र्यांनी पुन: या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सरकारात घटक असलेल्या मगोप तसेच गोवा फॉरवर्ड पक्षानेही या विषयावर पाठपुरावा करावा, सरकारवर दबाव आणावा आणि खाणी सरु करण्यास सरकार अपयशी ठरल्यास पाठिंबा काढावा, अशी मागणी आम्ही या पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन करणार आहोत, असे गावकर यांनी सांगितले.  

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर