शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Goa: जिम्नॅस्टिक प्रकारात महाराष्ट्राचे वर्चस्व कायम, संयुक्ता काळेने मिळविले वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 22:31 IST

Goa News: रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या संयुक्ता काळे हिने वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले. राही पाखले हिनेही ट्रॅम्पोलिन प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याने या प्रकारावर महाराष्ट्राचे वर्चस्व राहिले.

-समीर नाईकपणजी - रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या संयुक्ता काळे हिने वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले. राही पाखले हिनेही ट्रॅम्पोलिन प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याने या प्रकारावर महाराष्ट्राचे वर्चस्व राहिले. पेडे इनडोअर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक प्रकारात महाराष्ट्राने शुक्रवारी देखील दमदार खेळ दाखवला.

रिदमिक सांघिक व सर्वसाधारण सुवर्ण जिंकलेल्या संयुक्ता हिने हूप प्रकारात २६.४५ गुणांसह सुवर्ण जिंकले. तिची सहकारी निश्का काळे हिने २३.४५ गुणांसह रौप्य पदक पटकवत महाराष्ट्राला पहिली दोन्ही स्थाने मिळवून दिली. हरियाणाच्या लाईफ अदलखा हिने २३.३५ गुणांसह कांस्य पदक जिंकले. यानंतर महाराष्ट्राने अजून एक सुवर्ण व रौप्य पदक आपल्या खात्यात जमा केले.

राही पाखले हिने महिलांच्या ट्रॅम्पोलिन प्रकारात ४३.८८ गुणांसह सुवर्ण मिळविले. सेजल जाधवने ४१.२० गुण घेत महाराष्ट्राला रौप्य मिळवून दिले. केरळच्या अन्विता सचिन हिने ४०.७० गुणांसह कांस्य मिळविले.

गोव्याच्या स्नेहा महाजनला चौथे स्थान गुरुवारी झालेल्या रिदमीक जिमनॅस्टीक वैयक्तिक ऑल राऊंड फायनलमध्येही महाराष्ट्रच्या संयुक्ता काळे हीने ९६.४० गुणांसह सुवर्ण पदक प्राप्त केले. हरियाणाच्या लाईफ अदलखा, व महाराष्ट्राच्या निश्का काळे यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केला. या गटात गोव्याने चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. गोव्याच्या स्नेहा महाजन हीने ७१.१५ गुण मिळवित चौथेे स्थान प्राप्त केले.

टॅग्स :goaगोवा