शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : मगोपची रविवारी होणार आमसभा, केंद्रीय समितीला मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 18:33 IST

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची बहुचर्चित आमसभा रविवारी (24 डिसेंबर) सकाळी अकराच्या सुमारास पर्वरी येथील एका सभागृहात होणार आहे.

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची बहुचर्चित आमसभा रविवारी (24 डिसेंबर) सकाळी अकराच्या सुमारास पर्वरी येथील एका सभागृहात होणार आहे. मगोपच्या विद्यमान केंद्रीय समितीला या आमसभेत मुदतवाढ दिली जाण्याची दाट शक्यता आहे. मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर, ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दीपक प्रभू पाऊसकर, माजी आमदार तथा सचिव लवू मामलेदार, नरेश सावळ, कार्याध्यक्ष नारायण सावंत, पदाधिकारी आपा तेली, रत्नकांत म्हादरेळकर, प्रताप फडते आदी आमसभेत भाग घेणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पार पडणारी मगोपची ही पहिली आमसभा आहे. मगोपच्या केंद्रीय समितीची मुदत येत्या 31 डिसेंबरला संपुष्टात येत आहे. तथापि, सध्याच्याच केंद्रीय समितीला मुदतवाढ द्यावी आणि सर्व मतदारसंघांमध्ये पक्षाच्या समित्यांची रचना करून व संघटनात्मक बांधणी करून झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत संघटनात्मक निवडणुका घ्याव्यात असे यापूर्वी तत्त्वत: ठरलेले आहे.

आमसभेत आज तेच ठरण्याची शक्यता आहे. मगोपचे विलीनीकरण करण्याचा प्रश्नच नाही हे पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. केंद्रीय समितीमध्ये काही तरुणांना स्थान द्यावे असाही पक्षाच्या नेतृत्वाचा प्रारंभी विचार होता. तथापि, पक्षात त्याबाबत उलटसुलट चर्चा झाली. विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे सध्याचीच केंद्रीय समिती कायम ठेवावी असे तत्त्वत: ठरले आहे. कोणताही अंतिम निर्णय घेण्याचा आमसभेला अधिकार आहे. मगोपची केंद्रीय समिती आणि आमसभा ह्या सर्वोच्च मानल्या जातात. मगोपची सदस्य नोंदणी मोहीम यापुढे सुरू केली जाणार असल्याची माहिती पक्ष सुत्रंकडून मिळाली. येत्यावर्षी फोंडा शहरात होणा:या पालिका निवडणुका मगोपकडून स्वतंत्रपणो लढविल्या जाणार आहेत. 

दरम्यान, 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी मगोपने कोणती भूमिका घ्यावी याविषयी मगोपच्या आमसभेत आज चर्चा होण्याची शक्यता आहे. मगोप हा केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकारचा भाग अजून झालेला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी निदान उत्तर गोव्यात तरी मगोपने उमेदवार उभा करावा, अशी मागणी पक्षाचे काही सदस्य करत आहेत. मात्र एवढय़ा लवकर त्याविषयी निर्णय घेता येत नाही असे काही पदाधिका-यांचे म्हणणं आहे. मगोपच्या पदाधिका:यांना शासकीय महामंडळांवर, पीडीएंवर वगैरे स्थान मिळावे, अशीही मागणी पक्षातील एक गट करत आहे. 

टॅग्स :goaगोवा