शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कमी मते मिळाली तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2024 15:02 IST

लोकांना फक्त धर्म जातीवर विभाजन करण्याचे काम हे भाजपने केले आहे. जाती धर्माच्या नावाने त्यांनी मते मागितली आहे असा आरोप आपने केला.

नारायण गावस

पणजी: मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भाजपचे उमेदवार एका लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल असा आत्मविश्वास आहे तर या पेक्षा कमी मते मिळाली तर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. भाजपकडू्न इंडिया आघाडीला कमी दाखविण्याचा हा प्रकार असून  इंडिया आघाडीचे नेते एकत्र असून २०२७ विधानसभेच्या निवडणूकांची ही नांदी आहे, असे आम आदमी पक्षाचे समन्वय ॲड. अमित पालेकर यांनी गुरुवार आपच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत आपचे नेत वाल्मिकी नाईक व इतर उपस्थित होते. 

ॲड. अमित पालेकर म्हणाले, भाजप दक्षिण गोव्यात तसेच उत्तर गोव्यातील उमेदवार जिंकणार नाही याची भिती होती म्हणून मुख्यमंत्र्यांनी  दिवस रात्र झाेपडपट्टी परिसरही प्रचारासाठी पिंजून काढला. यंदा त्यांना लोकांकडून जास्त मते मिळणार नाही याची भिती हाेती. म्हणून खास दिल्लीतून माेठ्या नेत्यांना गोव्यात प्रचारासाठी बोलाविले होते. आता जर मुख्यमंत्री दोन्ही उमेदवार बहुमतांनी जिंकणार असे बाेलत आहे जर कमी मते पडली तर याची जबाबादारी स्वीकारुन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा  द्यावा. लोकांना फक्त धर्म जातीवर विभाजन करण्याचे काम हे भाजपने केले आहे. जाती धर्माच्या नावाने त्यांनी मते मागितली आहे. 

आरजी हा भाजपचा घटकआरजी ही फक्त भाजपची बी टीम नसून ताे भाजपचाच घटक आहे.  त्यांनी फक्त  मते विभाजन करण्याचा डाव रचला होता. पण यंदा  अनेक लोकांना त्यांचा हा डाव कळल्याने त्यांना लोकांनी मतदान केले नाही. आपल्याकडे पैसे नाही असे सांगणाऱ्या या पक्षाने निवडणूक कशी लढविली हा ही प्रश्न आहे. फक़्त गोमंतकीयांची मते विभाजन करण्याचे काम आरजीने केले आहे, असा आरोपही ॲड. पालेकर यांनी केला आहे.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४AAPआपPramod Sawantप्रमोद सावंतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४