शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
4
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
5
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
6
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
7
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
8
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
9
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
10
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
11
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
12
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
13
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
14
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
15
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
16
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
17
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
18
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
19
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
20
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?

Goa Lok Sabha Election 2024: दक्षिण गोवा मतदारसंघ: पल्लवींना भाजपकडून तिकीट; नरेंद्र, दामू, कवळेकर यांचा अपेक्षाभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2024 08:00 IST

Goa Lok Sabha Election 2024: पल्लवी या धेंपे उद्योग समुहाचे चेअरमन श्रीनिवास धेपे यांच्या पत्नी तसेच पर्येच्या आमदार दिव्या राणे यांच्या चुलत भगिनी होत.

Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी पल्लवी धेंपे यांना उमेदवारी जाहीर केली असून यासंबंधीची अधिकृत घोषणा रविवारी रात्री करण्यात आली. 

पल्लवी या धेंपे उद्योग समुहाचे चेअरमन श्रीनिवास धेपे यांच्या पत्नी तसेच पर्येच्या आमदार दिव्या राणे यांच्या चुलत भगिनी होत. त्यांच्या रुपाने दक्षिण गोव्याला नवा चेहरा उमेदवार म्हणून मिळाला आहे. भाजपने प्रथमच लोकसभेसाठी महिला उमेदवार दिला आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल शनिवारी रात्री उशिरापर्यंत चालली. या बैठकीत पल्लवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपने केडरबाहेरील उमेदवार देण्याची घटनाही प्रथमच घडली आहे.

अखेरच्या क्षणी तिकिटासाठी दामू नाईक यांच्या नावावरही चर्चा झाली. परंतु महिलेलाच उमेदवारी देण्याबाबत भाजपचे केंद्रीय नेते अखेरपर्यंत ठाम राहिले. उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांच्या रुपाने भंडारी आणि दक्षिण गोव्यात पल्लवी यांच्या रुपाने सारस्वत उमेदवार भाजपने दिला आहे. उत्तरेत श्रीपाद यांचे नाव पक्षाने पहिल्याच यादीत जाहीर केले होते. धेंपे कुटुंब भाजप समर्थक असून त्यांनी कायम भाजपला मदत केली आहे. 

पल्लवी सध्या वर्तमानपत्र व्यवसाय सांभाळत आहेत. अधून-मधून त्या सामाजिक कार्यामध्येही भाग घेतात. धेंपे उद्योग समुहाचा पूर्वी खाण व्यवसाय होता. नंतर त्यांनी खाणी वेदांता कंपनीला विकल्या. दक्षिण गोव्यातील खाणपट्टयात एकेकाळी धेंपे कंपनीच्या खाणींवर काम करणाऱ्या कामगारांच्या कुटूंबांचे धेंपे कुटूंबियांकडे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. धेंपे फुटबॉल संघामुळेही दक्षिण गोव्यात हे कुटूंब घराघरात परिचित झाले.

सारस्वत समाजात या कुटूंबाला आदराचे स्थान आहे. श्रीनिवास धेंपे हे पर्तगाळी मठाचे अध्यक्ष असून धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. श्रीनिवास धंपे यांचे चुलत आजोबा वै. वैकुंठराव यांनी एकेकाळी विधानसभेसाठी पेडणे मतदारसंघतून कॉग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु तेव्हा ते पराभूत झाले होते. आता त्यांच्या सुनेला दक्षिण गोव्यातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे.

भाजपने लोकसभेसाठी पल्लवी धेंपे यांच्या रुपाने प्रथमच नवा चेहरा व केडरबाहेरील उमेदवार दिला आहे. महिला उमेदवार देण्याच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयामुळे दक्षिण गोवा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार एनआरआय आयुक्त तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि भाजपचे सरचिटणीस तथा माजी आमदार दामू नाईक यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

महिलांचा सन्मान : मुख्यमंत्री सावंत

'भाजपने गोव्यात महिलांचा सन्मान, महिलांना न्याय देताना ५० राजकीय राखीवता दिली. लोकसभेसाठी प्रथमच महिला उमेदवार दिला. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दक्षिण गोव्यात यावेळी महिला उमेदवार इतिहास घडवेल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले, धेपे कुटुंबीयांचे समाजासाठी फार मोठे योगदान आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच पल्लवी यांना उमेदवारी दिलेली आहे.'

सर्वजण काम करतील : तानावडे

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, 'पल्लवी या पूर्वीपासून भाजपच्या सदस्य आहेत. त्यांना नव्याने पक्षात प्रवेश देण्याचा प्रश्नच नाही. येथून तिकिटासाठी इच्छुक बाबू कवळेकर, नरेंद्र सावईकर वगैरे सर्वजण पल्लवी यांच्यासाठी काम करतील. बूथ ते राज्य स्तरापर्यंत सर्वजण त्यांच्या विजयासाठी झटतील. दरम्यान, बाबू कवळेकर हे शिमोत्सवाला जावे लागल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. नरेंद्र सावईकर हेही उपस्थित नव्हते.

काय म्हणाले विरोधी पक्ष?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, 'भाजपने जे कार्यकर्ते पक्ष वाढवण्यासाठी खपले त्यांना डावलून उमेदवार आयात केले. 'आजच भाजपात प्रवेश केलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली. भाजपला कार्यकर्त्यांमध्ये उमेदवार सापडू नये,' हे दुर्दैव असल्याचे पाटकर म्हणाले.

मनोज परब म्हणाले, भाजपने निष्ठावान कार्यकर्त्यांना दुखवले आहे. उत्तर व दक्षिण दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आरजीचा विजय सुकर झाला आहे. या निर्णयाबद्दल परब यांनी भारतीय जनता पार्टीचे आभारही मानले आहेत.

आपचे अमित पालेकर म्हणाले, भाजप महिला कार्यकर्त्या केवळ ढोल वाजवण्यासाठीच आहेत का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

विरोधी पक्ष नेत्यांची जोरदार टीका

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जळजळीत प्रतिक्रिया देताना भाजपने उद्योगपतीला तिकीट लाटून निष्ठावान कार्यकर्त्यांचा त्याग, निष्ठेची आहुती दिली. भांडवलदारांसमोर भाजप झुकला. भाजपची हतबलता यातून स्पष्ट झाली तसेच स्थानिक नेतृत्व केंद्राच्या हुकूमशाहीपुढे झुकले, हेच यातून दिसून आले, अशी जोरदार टीका केली आहे. 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा