शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Goa Lok Sabha Election 2024: रुडॉल्फ फर्नाडिस, राजेश फळदेसाई यांची सांताक्रूझ, कुंभारजुवे मतदारसंघात लागणार कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 08:03 IST

Goa Lok Sabha Election 2024: अल्पसंख्याक मते वळवण्याचे आव्हान

Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : तिसवाडी तालुक्यात सांताक्रुझ, कुंभारजुवेतील खिस्ती मते भाजपकडे वळवण्यासाठी आमदार रुडॉल्फ फर्नाडिस व राजेश फळदेसाई यांची कसोटी लागणार आहे.

सांताक्रुझ मतदारसंघात एकूण २९,३५४ मतदार असून यापैकी सुमारे ११,५०० ख्रिस्ती मते आहेत. खुद्द सांताक्रुझ, कालापूर, मेरशी भाग ख्रिस्तीबहुल आहे. काँग्रेसची ही एकगठ्ठा मते मानली जातात. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत टोनी फर्नांडिस हे काँग्रेसच्या तिकिटावर येथे निवडून आले; परंतु नंतर दोन वर्षांतच जुलै २०१९ मध्ये ते इतर नऊ आमदारांसोबत काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये आले.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत टोनी यांना भाजपने तिकीट दिले; परंतु मतदारांनी त्यांना घरी पाठवले. अल्पसंख्याकांनी भाजपला मतदान केले नाही. रुडॉल्फ फर्नांडिस काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले; परंतु तेही सप्टेंबर २०२२ मध्ये फुटले व त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. रुडॉल्फ यांची मते भाजपकडे वळवण्यासाठी कसोटी लागणार आहे.

सांत आंद्रेत सिल्व्हेरांवर भिस्त सांत आंद्रेमध्ये एकूण २१,२९५ मतदार आहेत. पैकी १०,५०० खिस्ती मतदार आहेत. येथे आरजीचे वीरेश बोरकर हे आमदार आहेत. फ्रान्सिस सिल्वेरा यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर केवळ ७० मतांनी पराभव झाला होता. गोवा वेल्हा, आगशी, सांत आंद्रे भागांत मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती मतदार आहेत. त्यांचा कल नेहमीच काँग्रेसकडे राहिलेला आहे. 

फ्रान्सिस सिल्वेरा यांनी पराभव झाला तरी आपले काम चालूच ठेवले आहे. विकसित भारत यात्रा तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये ते भाग घेत असतात. सिल्वेरा हे भाजप उमेदवाराला किती मते मिळवून देतात पाहावे लागेल.

काँग्रेसची एकगठ्ठा मते

कुंभारजुवे मतदारसंघातही दिवाडी बेट, सांतइस्तेव्ह, जुने गोवेचा काही भाग, खोर्ली, सांपेद्र वगैरे भागांत ख्रिस्ती मतदारांची संख्या लक्षणीय आहे. एकूण २६,८१५ मतदारांपैकी ८,५०० मतदार ख्रिस्ती आहेत. या मतदारसंघात काँग्रेसच्या एकगठ्ठा मतांचा फेब्रुवारी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत राजेश फळदेसाई यांना फायदा झाला. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले; परंतु नंतर रुडॉल्फ व इतरांसोबत सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसमधून फुटून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही मते भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्याकडे वळवण्यासाठी फळदेसाई यांचीही कसोटी लागणार आहे.

पणजीत ख्रिस्ती आणि सारस्वत मते जाणार कोणाकडे?

दरम्यान, पणजी मतदारसंघात २२,३४० मतदार असून पैकी ६२०० ख्रिस्ती आहेत. यांत सुमारे १५०० मतदार ख्रिस्ती सारस्वत आहेत. ही १५०० मते आजपावेतो दिवंगत पर्रीकर यांच्या पारड्यात जात असत. पणजीत मुख्य कार्यालयाच्या मागील बाजूस तसेच चर्च स्क्वेअर परिसर, कांपाल, मिरामार येथे ख्रिस्तीबहुल भागातील मते नेहमीच काँग्रेसकडे जातात. चर्च स्वचेअर, मेरी इम्पॅक्युलेट हायस्कूल, होम सायन्स कॉलेज तसेच मिरामार येथील काही बुथांवर ख्रिस्ती मते बिगरभाजप उमेदवारांकडे जात असल्याचे याआधीच्या निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. ही मते बाबुश यांना श्रीपाद यांच्याकडे वळवावी लागतील.

सांताक्रुझ मतदारसंघात एकूण २९,३५४ मतदार असून यापैकी सुमारे ११,५०० ख्रिस्ती मते आहेत. सांत आंद्रेमध्ये एकूण २१,२९५ मतदार आहेत. पैकी १०,५०० ख्रिस्ती मतदार आहेत.

 

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४