शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोव्यात आता काँग्रेसचीही ‘गॅरेंटी’, म्हादईचे रक्षण, वादग्रस्त तिन्ही प्रकल्प मोडीत काढण्याचे आश्वासन

By किशोर कुबल | Updated: April 21, 2024 14:42 IST

Goa Lok Sabha Election 2024: गोवा प्रदेश कॉग्रेसने काल इंडिया अलायन्सच्या उमेदवारांसाठी २१ कलमी जाहिरनामा घोषित केला. म्हादईचे रक्षण, वादग्रस्त तिन्ही प्रकल्प मोडीत काढणार, कोळसा वाहतूक बंद करणार, सरकारी व खाजगी नोकय्रांमध्ये स्थानिकांना प्राधान्य आदी आश्वासने देण्यात आली आहेत.

- किशोर कुबल पणजी - गोवा प्रदेश कॉग्रेसने काल इंडिया अलायन्सच्या उमेदवारांसाठी २१ कलमी जाहिरनामा घोषित केला. म्हादईचे रक्षण, वादग्रस्त तिन्ही प्रकल्प मोडीत काढणार, कोळसा वाहतूक बंद करणार, सरकारी व खाजगी नोकय्रांमध्ये स्थानिकांना प्राधान्य आदी आश्वासने देण्यात आली आहेत. कॉग्रेस भवनात जाहिरनामा प्रकाशित करताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, दोन्ही उमेदवार अॅड. रमाकांत खलप व विरियातो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकॉस्ता तसेच आमदार कार्लुस फेरेरा उपस्थित होते.

कायदेशीर खाणी सुरु करणार, दाबोळी विमानतळ चालूच रहावा यासाठी उपाययोजना, आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणार, महिला सबलीकरणासाठी उद्योजकतेला प्रोत्साहन, महामार्गांलगत स्थानिक विक्रेत्यांसाठी विशेष विभाग, कारागीर तसेच खेळाडूंना प्रोत्साहन, पर्यटन क्षेत्राचा फेरआढावा घेऊन सुधारणा, पर्यावरणाभिमुख उद्योग, शैक्षणिक सुविधा वाढवणार, जमिनी विक्रीवर निर्बंध, फक्त गोवेकरांनाच जमिनी विकत घेता येणार, एसटींना राजकीय आरक्षण आदी आश्वासनेही जाहीरनाम्यात देण्यात आलेली आहेत.

तिन्ही प्रकल्प मोडीत काढणार - अमित पाटकरप्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले कि,‘ रेल्वे दुपदरीकरण, अभयारण्यातून होणार असलेला राष्ट्रीय महामार्ग विस्तार व तामनार वीज प्रकल्प हे तिन्ही प्रकल्प केंद्रात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास मोडीत काढले जातील. सरकार भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यात अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली ते म्हणाले की, ४ कोटी रुपये खर्च करुन मेगा जॉब फेअर आयोजित केला. परंतु प्रत्यक्षात २५१ जणांनाच त्याही हंगामी नोकऱ्या मिळाल्या.’

गोवा हे अपघात, खुनांचे ‘डेस्टिनेशन’,  तर बलात्कारांची राजधानी : युरीराज्यात दररोज अपघात होत आहेत. गोवा हे अपघात, खुनांचे डेस्टिनेशन तर बलात्कारांची राजधानी बनली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केली. ते म्हणाले की, ‘सरकारी जावई असलेल्या कंत्राटदाराने महामार्गांचे काम अत्यंत निकृष्टरित्या केले. ‘रोड इंजिनीयरिंग’ योग्य प्रकारे झालेले नाही.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसnorth-goa-pcउत्तर गोवाsouth-goa-pcदक्षिण गोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४