शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक शेतकरी बनले आत्मनिर्भर, वर्षभरात फलोत्पादन मंडळाकडून शेतकऱ्यांची १,०५१ टन भाजी खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 15:36 IST

Goa News: यंदाच्या २०२३ या वर्षी राज्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात भाजीची लागवड केली होती. गोवा फलोत्पादन मंडळाद्वारे स्थानिक शेतकऱ्यांकडून  १०५१.७७ टन भाजीपाला खरेदी करण्यात आला.

- नारायण गावस पणजी - यंदाच्या २०२३ या वर्षी राज्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात भाजीची लागवड केली होती. गोवा फलोत्पादन मंडळाद्वारे स्थानिक शेतकऱ्यांकडून  १०५१.७७ टन भाजीपाला खरेदी करण्यात आला, ज्याची किंमत रु. ३ कोटी ८४ लाख एवढी आहे. एकूण ८९७ शेतकऱ्यांना हा फायदा झालेला आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे वळवत आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना विविध सुविधा दिल्या जातात. स्थानिक शेतकऱ्ंयांना भाजीपाला लागवडीला चालना देण्यासाठी आणि भाजीपाल्यासाठी इतर राज्यांवरील अवलंबन कमी करण्यासाठी ही लागवड क्षेत्र वाढविले आहे. माेठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात विकास हाेत आहे. त्यामुळे बेळगाव, काेल्हापूर  इतर ठिकाणावरुन  आयात केली जाणारी भाजी कमी करण्याचा कृषी खात्याचा प्रयत्न आहे.

८९७ शेतकऱ्यांनी घेतला ३.८४ कोटींचा फायदाराज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली भाजी फलोत्पादन मंडळाला विक्री करुन मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. मोठ्या  प्रमाणात शेतकरी भेंडी,  मिरची, दुधी, काकडी, वांगी यासारखी भाजी मोठ्याप्रमाणात उत्पादीत करत आहेत. यामुळे ही भाजी फलोत्पादन मंडळाला दिली जाते. राज्यातील काकडी तसेच भेंडी, मिरची यांचे उत्पादन माेठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ही भाजी गाेव्यातून परराज्यातही निर्यात केली जाते. त्यामुळे राज्यात भाजी लागवड खूपच वाढले आहे.

फलोत्पादन मंडळाकडून प्रोत्साहनराज्यात फलाेत्पादन मंडळाकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भाजी लागवडीसाठी प्राेत्साहन दिले जात आहे. लागवड क्षेत्र वाढल्याने अनेक लाेकांना मोठा प्रमाणात फायदाही झालेला आहे. त्यामुळे जास्त शेतकरी आता भाजी लागवड करत आहेत. फलाेत्पादन मंडळाकडून त्यांना याेग्य तो दरही दिला जातो. या तसेच त्यांना योग्य प्रशिक्षणही कृषी खात्याकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक शेतकऱ्यांची भाजीपाल्याच्या लागवडीत माेठ्या प्रमाणात वाढ  झालेली आहे, असे फलाेत्पादन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाAgriculture Sectorशेती क्षेत्र