शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : डिचोलीत बिबट्या जेरबंद, वन खात्याच्या प्रयत्नांना यश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 17:24 IST

सातत्याने आलेल्या तक्रारींनंतर वन विभागाने येथे पिंजरा (सापळा) लावला होता. त्यात रविवारी बिबट्या अडकला.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : डिचोलीतील धबधबा परिसरात गेली अनेक दिवस दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन खात्याच्या अधिकाऱ्यांना रविवारी पहाटे यश आले. या भागात बिबट्याचा सतत वावर होता. त्याने काही कुत्र्यांचीही शिकार केली होती. सातत्याने आलेल्या तक्रारींनंतर वन विभागाने येथे पिंजरा (सापळा) लावला होता. त्यात रविवारी बिबट्या अडकला.

गावातील नागरिकांना बिबट्याची भीती सतावत होती. त्यामुळे वन खात्याला माहिती देण्यात आली. वन खात्याचे कर्मचारीही या ठिकाणी नजर ठेवून होते. त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. बिबटा सापळ्यात अडकल्याचे समजल्यावर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला पिंजऱ्यातून सुरक्षित ठिकाणी नेले. बिबट्या सापळ्यात अडकल्यामुळे दिलासा मिळाल्याचे स्थानिकांनी सागितले. हा बिबट्या पकडण्यात यश आले असले तरी डिचोलीतील अनेक भागात बिबट्यांच्या वावर सुरू आढळून येतो. पाजवाडा येथे एक बिबट्या व लहान पिल्लू फिरत असल्याचेही स्थानिकांना आढळून आले आहे. तसेच व्हाळशी, मुळगाव, मये, नार्वे आदी भागात नेहमीच बिबट्या दर्शन घडत असते. 

दरम्यान, केरी वन विभागाचे अधिकारी सॅबेस्तेव रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला आहे. त्याला आता नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :goaगोवा