शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गोवा बनतोय ‘किलर स्टेट’; पर्यटकांनो सावधान, जीवाशी खेळ करू नका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:50 IST

राज्याची लोकसंख्या केवळ १६ लाख असली तरी वर्षाकाठी सव्वाकोटी पर्यटक गोव्यात येतात. वाढत्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

किशाेर कुबल पणजी : वाढते रस्ता अपघात आणि बुडून मरण पावण्याच्या घटना यामुळे गोवा ‘किलर स्टेट’ बनला आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात राज्यात रस्ता अपघातांमध्ये १,०२२ बळी गेले. तब्बल १३,७६५ अपघातांची नोंद या कालावधीत झाली. जगाच्या नकाशावर गोवा हे लौकिकप्राप्त पर्यटनस्थळ म्हणून झळकत असल्याने देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत असतात.

राज्याची लोकसंख्या केवळ १६ लाख असली तरी वर्षाकाठी सव्वाकोटी पर्यटक गोव्यात येतात. वाढत्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अधिकृत माहितीनुसार पाच वर्षांत नोंद झालेल्या १३,७६५ रस्ता अपघातांपैकी ९२४ अपघात जीव घेणारे ठरले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, ७० टक्के बळी दुचाकी अपघातातील असतात. अनेकदा भीषण अपघातांमध्ये दुचाकी चालवणारा, तसेच मागे बसलेली व्यक्तीही प्राण गमावून बसते. त्यामुळे दोघांनीही हेल्मेट परिधान करणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

गेल्या वर्षी बुडताना वाचवले ६३९ पर्यटकांचे प्राण दृष्टी लाइफ सेव्हिंगच्या जीवरक्षकांनी गेल्या वर्षी ७६४ घटनांमध्ये ६३९ जणांना बुडण्यापासून वाचवले. याचा अर्थ दररोज सरासरी दोघांचे जीव वाचले. यात सर्वाधिक ११९ पर्यटक कर्नाटकातील होते. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील १०६ पर्यटकांचा क्रमांक लागतो. बुडण्यापासून वाचवण्यात आलेल्या १२० परदेशी पर्यटकांमध्ये प्रामुख्याने ७० रशियन आणि १६ ब्रिटिश नागरिक होते. 

५ वर्षांत १०५ पर्यटक बुडालेगेल्या पाच वर्षांत गोव्यातील समुद्र किनारे, नद्या, तसेच धबधब्यांवर १०५ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. दक्षिण गोव्यात २१ जणांनी प्राण गमावले. मद्यपान करून समुद्रात उतरणे किंवा धबधब्यावर जाणे यामुळे दुर्घटना घडतात. दृष्टी लाइफ सेव्हिंगचे ६०० जीवरक्षक किनारे व धबधबे मिळून ४१ ठिकाणी सेवा देत आहेत. 

वाहन चालकांना विशेषत: दुचाकी चालवणारे, तसेच मागे बसणारी व्यक्ती अशा दोघांनीही हेल्मेट वापरावे, वेगाने वाहन चालवू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये यासाठी पोलिस जागरूक राहून दंडात्मक कारवाई करत असतात - चेतन सावलेकर, वाहतूक पोलिस निरीक्षक, पणजी   

टॅग्स :tourismपर्यटन