शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

राफेल डीलवरून गोवा सरकारमध्ये खळबळ; ऑडिओ क्लीपच्या चौकशीची सत्ताधाऱ्यांचीही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 18:59 IST

पणजी : राफेलप्रश्नी ऑडिओ क्लीप बाहेर आल्याच्या विषयावरून गोवा सरकारमध्येही खळबळ उडाली आहे. ही क्लीप खोटी असल्याचे भाजपचे मंत्री ...

पणजी : राफेलप्रश्नी ऑडिओ क्लीप बाहेर आल्याच्या विषयावरून गोवा सरकारमध्येही खळबळ उडाली आहे. ही क्लीप खोटी असल्याचे भाजपचे मंत्री आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगून या प्रकरणी पोलिस चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. दुसऱ्याबाजूने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे निश्चितच या प्रकरणी चौकशी करून घेतील, असे भाजपचे दुसरे एक मंत्री निलेश काब्राल यांनी म्हटले आहे. तर पर्रीकर यांच्याकडे राफेलच्या महत्त्वाच्या फाईल्स असल्याने पर्रीकर यांना संरक्षण दिले जावे, अशी मागणी विरोधी काँग्रेस पक्षाने केली आहे.

राफेलच्या विषयावरून गोव्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपविरुद्ध काँग्रेस असा नवा वाद सुरू झाला आहे. मात्र ऑडिओ क्लीपचे गांभीर्य वाढले आहे. राफालेविषयीच्या महत्त्वाच्या फाईल्स आपल्याकडे व आपल्या बेडरूममध्ये आहेत असे पर्रीकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीवेळी मंत्र्यांना सांगितले असे मंत्री राणे यांनी म्हटल्याचे ऑडिओ क्लिपद्वारे विरोधी काँग्रेस पक्ष सांगत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. या क्लीपमधील आवाज हा मंत्री राणे यांचाच आहे असे आपण सांगू शकतो, कारण आपण साऊंड इंजिनिअरही आहे असे बुयांव म्हणाले.

राणे यांची लाय डीटेक्टर चाचणी झाली तर सत्य बाहेर येईल. त्यामुळे लाय डिटेक्टर चाचणी व्हावी. तसेच राणे यांच्यासोबत जी व्यक्ती क्लीपमध्ये बोलताना आढळते, त्या व्यक्तीला पोलिस संरक्षण दिले जावे आणि मुख्यमंत्री पर्रीकर यांनाही सुरक्षा पुरविली जावी, कारण स्व. लोधा, हरेन पांडय़ा यांच्याबाबतची पुनरावृत्ती गोव्यात व्हायला नको. पर्रीकर यांच्या जीवितास भाजपकडून धोका संभवतो असे बुयांव म्हणाले.

पर्रीकर आता संरक्षण मंत्री नाहीत, तरी देखील त्यांच्याकडे राफेलविषयीच्या फाईल्स असल्याने देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातून देशाच्या गृह मंत्र्यांनी या विषयात लक्ष घालावे. लगेच सीबीआयसारख्या यंत्रणोला पर्रीकर यांच्या फ्लॅटची झडती घेण्यास सांगितले जावे. एवढेच नव्हे तर दिल्लीत र्पीकर यांच्यासोबत कृष्णमूर्ती व अन्य अधिकारी असायचे व त्यामुळे त्यांचीही चौकशी सीबीआयने करावी असे बुयांव म्हणाले. राफेलविषयी र्पीकर ज्यावेळी बोलले तेव्हा  जे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते, त्यांचीही चौकशी केली जावी, ते खरे सांगू शकतील असे बुयांव म्हणाले.

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी ऑडिओ क्लीपच्या विषयाबाबत ट्वीट केले आहे. सर्वोच्च न्यायालयात हरल्याने काँग्रेस पक्ष नैराश्याने राफेलप्रश्नी खोटी माहिती उभी करू पाहत आहे. पण मंत्रिमंडळ बैठकीत किंवा अन्य कोणत्याच बैठकीत राफेलविषयी चर्चा झालेली नाही असे पर्रीकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरRafale Dealराफेल डीलgoaगोवा